Shark Tank India : व्यापारी क्षेत्रात रुची असलेल्या प्रत्येक माणूस सोनी टीव्हीवर सुरू असलेला Shark Tank India हा कार्यक्रम पाहताच असेल. शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमा अंतर्गत देशातील काही मान्यवर वेगवेगळ्या स्टार्टप्सना(Startups) आर्थिक मदत करतात तसेच त्या स्टार्टअप मधली काही हिस्सेदारी विकत घेतात. तुम्ही आतापर्यंत अनुपम मित्तल, अमन गुप्ता, नमिता थापर अशा अनेक गुंतवणूकदारांना आणि व्यावसायिकांना सदर कार्यक्रमात पाहिलंच असेल. Shark Tank Indiaचा सध्या सोनी टीव्हीवर तिसरा सिझन सुरू असून त्यामधला दुसरा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला होता आणि या एपिसोडची खासियत नेमकी काय होती हे जाणून घेऊया…..
Shark Tank India मध्ये नेमकं झालं तरी काय?
तर सोनी टीव्हीवर सुरू असलेला व्यापाऱ्यांचा आणि गुंतवणूकदारांचा कार्यक्रम म्हणजेच Shark Tank India. पहिले दोन्ही सिझन प्रतेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर आता तिसऱ्या सिजनची दमदार सुरुवात झाली आहे, नवीन सिझन सुरु झाल्यापासुन यामध्ये दुसऱ्या एपिसोडची चर्चा सर्वत्र केली जातेय कारण, या एपिसोडमध्ये दीपंदर गोएल म्हणजेच Zomato या प्रसिद्ध Delivery App चे संस्थापक यांना एका एका महिलेनं कौतुक करण्यास भाग पडलं होतं. संपूर्ण एपिसोडमध्ये एकूण तीन स्टार्टप्सनी पीच दिली, यापैकीच एक होती नोएडाची हेल्दी स्टनिंग स्टार्टअपची सुरुवात करणारी एक उद्योजिका . नोएडा मध्ये राहणाऱ्या प्रियाशा सलुजा असं त्यांचं नाव असून नोएडा-63 मध्ये त्यांची फॅक्टरी आहे आणि या स्टार्टअपची सुरुवात त्यांनी वर्ष 2019 मध्ये केली होती.
यापूर्वी एका मार्केटिंग कंपनीमध्ये त्या काम करत होत्या. त्यांच्या स्टार्टअप अंतर्गत केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये 100% ग्लूटन मुक्त, दुग्धविरहित आणि प्लांट बेस्ड पदार्थांची विक्री केली जाते. सुरुवातीला केवळ पन्नास हजार रुपयांमधून हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता, व्यवसायाबद्दल अधिक माहिती देत असताना त्या म्हणाल्या होत्या की सुरुवातील ओवन ब्लेंडर आणि काही बेकिंग ट्रेची खरेदी करून या व्यवसायाची सुरुवात झाली होती.
दरम्यान गुप्ता यांनी काही इक्विटीसह त्यांना 50 लाख रुपयांचा कर्ज देऊ केलं मात्र व्यवसायातील ज्ञान आणि कौशल्य दाखवत प्रियाशा यांनी “क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर आपल्याला स्वस्त दरात कर्ज सहज मिळेल” असं म्हटलं. त्यांचे हेच व्यावसायिक ज्ञान पाहता दीपंदर गोएल यांनी त्यांचं हसत हसत कौतुक केलं व “तुम्हीच खऱ्या अर्थाने शार्क आहात” असं म्हणत त्यांची पाठ थोपटली (Shark Tank India). तसंच, यापुढे व्यवसायात काही गरज भासल्यास आपण नक्कीच मार्गदर्शन करू असं आश्वासन दीपंदर गोएल यांनी दिलं होतं.