Shiv Nadar : श्रीमंत व्यक्ती म्हटलं कि आपल्या मनात पहिली येतात ते म्हणजे अदानी आणि अंबानी. पण आपण किती पैसे कमावतो यापेक्षा इतरांच्या मदतीला किती येतोय हे जास्ती महत्वाचे नाही का? आणि या ना अदानीचा नंबर लागतो ना अंबानींचा. या व्यक्तीचे नाव आहे शिव नाडर .. अनेकदा काय होतं कि देशातील किंवा जगातील सर्वात दानशूर माणूस कोण असा प्रश्न उपस्थित झाला कि आपण एकदम विचारात गढून जातो आणि काही केल्या ते नाव आठवत नाही. तुम्ही कधी IT कंपनी HCL टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर यांचे नाव ऐकलं आहे का? हो तर आज आपण त्यांच्याच बद्दल बोलत आहोत. त्यांच्या संपत्तीची मोजणी केली तर त्यांचा तिसरा क्रमांक असेल पण गरजू माणसांना दान करण्यामध्ये तेच सर्वात अव्वल स्थानावर आहेत.
शिव नाडर यांनी किती संपत्ती केली दान – Shiv Nadar
एका अहवालानुसार अब्जाधीश शिव नाडर (Shiv Nadar) यांनी 2042 कोटी रुपयांची देणगी दिली आहे आणि यंदा पुन्हा एकदा नाडर पाच वर्षांत तिसऱ्यांदा क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. हुरून इंडियाचा अहवाल सांगतो कि 100 कोटी रुपये दान देणाऱ्या व्यक्तींमध्ये आता वाढ झाली आहे व 2 वरून थेट हा आकडा 14 वर पोहोचला आहे. तसेच 50 कोटी रुपये दान करणाऱ्यांची संख्या 5 वरून 24 झाली आहे. टॉप 10 देणगीदारांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 5,806 कोटी रुपयांची देणगी दिली.
बाकी देणगी देणारी माणसं कोण?
बाकी देणगी देणाऱ्या व्यक्तींची नाव पाहिली तर, देशातील परिचित उद्योगपती गौतम अदानी यांनी 285 कोटी रुपयांची देणगी दिलेली असून त्यांचा पाचवा क्रमांक लागतो ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्ज्याधीश आहेत, तर मुकेश अंबानी हे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी 376 कोटी दान केले आहेत व ते तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांव्यतिरिक्त अजीज प्रेमजी, कुमार बिर्ला अश्या उद्योगपतींची नावं अव्वल स्थानी पाहायला मिळतात.