Silai Machine Yojana : महिलांनो, आता घरबसल्या पैसे कमवता येणार; सरकारने आणली जबरदस्त योजना

बिझनेसनामा ऑनलाईन (Silai Machine Yojana) देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवत असते. महिलांच्या हाताला काम मिळावं, त्यांना इतर कोणावर अवलंबून न राहता त्या स्वावलंबी बनाव्या यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आता महिलांना घरबसल्या पैसे कमवता यावेत यासाठी मोफत शिलाई मशीन योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलाना सरकारकडून फ्री मध्ये शिलाई मशीन मिळेल. आणि या द्वारे घरबसल्या काम करून, कपडे शिवून महिला पैसे कमवू शकतात आणि आपला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते.

देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन (Silai Machine Yojana) उपलब्ध करून देणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्टय आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारला 50,000 हून अधिक शिलाई मशीन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सर्व महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि रोजच्या जीवनातील खर्चाला हातभार लागावा यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. ही योजना देशातील कोणकोणत्या राज्यात लागू करण्यात आली आहे? त्यासाठी पात्रता काय आहे? आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा हेच आज आपण जाणून घेऊयात.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी काय आहे पात्रता?

या योजनेसाठी केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच अर्ज करू शकतात.
सदर अर्जदार महिलांचे वय 20 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
या योजनेत विधवा आणि अपंग महिलांना प्राधान्य मिळू शकते.
सदर अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 25 हजारांपेक्षा जास्त नसावे (वेगवेगळ्या राज्यानुसार हा आकडा वेगवेगळा असू शकतो).

सध्या ही योजना महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगड, बिहार या राज्यांसाठी लागू करण्यात आली आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे लागतात ?

1) आधार कार्ड
2) ओळखीचा दाखला
3)रहिवासी दाखला
4)उत्पन्नाचा दाखला
5)वयाचा दाखला
6)अर्जदार अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र
7)जर अर्जदार महिला विधवा असेल तर तिचे निराधार प्रमाणपत्र
8)मोबाईल नंबर
9)पासपोर्ट आकाराचा फोटो

कसा करावा अर्ज?

सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://www.india.gov.in/
यानंतर मोफत शिलाई मशीन योजनेच्या (Silai Machine Yojana) लिंकवर जा.
आता राज्य सरकार ऑनलाइन अर्ज मागवत असेल तर ऑनलाइन अर्ज भरा.
ऑनलाइन अर्जाची लिंक उपलब्ध नसल्यास अर्जाचा फॉर्म PDF डाउनलोड करा
यानंतर अर्जात जी काही माहिती मागितली आहे ती भरा
फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
शेवटी फॉर्म संबंधित विभागाकडे जमा करा.
अशा प्रकारे तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता