Sim Card Rules : तुम्ही नवीन मोबाईल विकत घेतला आहे म्हणून नवीन सिमकार्ड घेण्याच्या विचारात आहात का? किंवा दुसऱ्या एका टेलिकॉम कंपनीच्या सेवेची निवड करणार असाल तर सिम कार्डाच्या खरेदीबद्दल हि नवीन माहिती जाणून घेणं तुमच्यासाठी फारच महत्वाचं आहे. कारण सिम कार्ड विकत घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यकता आता बदलली आहेत. यापूर्वी सिम कार्डची खरेदी करण्यासाठी काही विशेष कागदपत्रांची गरज पडायची ज्यात फेरबदल करण्यात आले आहेत. आता नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी पेपर बेस्ड KYC ची गरज पडणार नाही, ज्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून सुरु केली जाईल. हे बदल कोणते जाणून घेऊया….
सिम कार्ड खरेदी करताना कागदपत्रे नकोय: (Sim Card Rules)
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (Department Of Telecommunication) यांच्याकडून सिम कार्डच्या खरेदीबाबत एक महत्वाचा निर्णय जारी करण्यात आला आहे. नवीन निर्णयाच्या आधारे सिम कार्डच्या खरेदीसाठी आता पेपरबेस्ड KYCची असलेली आवश्यकता रद्ध करण्यात येणार आहे. यामुळे कंपन्यांची प्रोसेस सुधारेल, सिम कार्डच्या बाबतीत होणारी फसवणूक कमी होईल तसेच खर्च कमी झालेला पाहायला मिळेल आणि सरकारला सिम कार्ड फ्रॉडवर लक्ष ठेवायला मदत होणार आहे (Sim Card Rules).
सध्या आपल्याला नवीन कार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, एखादा फॉर्म अश्या अनेक महत्वाच्या गोष्टी सोबत आणाव्या लागतात, मात्र नवीन निर्णय अंमलात आणला जाण्याने या सर्वांची जबाबदारी KYC घेईल, आणि यानंतर एखादा मोबाईलमधला डिजिलॉकर सुद्धा तुमची मदत करू शकतो. हि सर्व माहिती डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने मंगळवारी माध्यमांना दिली. याआधी ऑगस्ट 2023मध्ये टेलिकॉम विभागाने एक महत्वाची घोषणा केली होती त्यामध्ये त्यांनी सिम कार्डच्या विक्रीवर विक्रेत्यांसाठी नियम कडक करण्यात आले आहेत अशी माहिती दिली होती. आता नवीन नियमांमुळे फसवणुकिंवर आळा बसणार आहे (Sim Card Rules).