SIP Calculator । सध्याच्या महागाईच्या काळात Mutual Funds हे गुंतवणुकीचे उत्तम आणि सोयीस्कर साधन मानलं जाते. जर तुमच्यासाठी जास्त पैसे नसतील तरीही तुम्ही आहे त्या पगारातून काही पैशाची गुंतवणूक करणार असाल तर SIP म्हणजेच Systematic Investment Plan च्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करू शकता. यावर तुम्हाला जास्ती प्रमाणात व्याजही मिळत असून अश्याप्रकारे गुंतवणूक करत तुम्ही नक्कीच येणाऱ्या काळात करोडपती सुद्धा बनू शकता. कसं ते जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा…
काय आहे Systematic Investment Plan (SIP)?
Systematic Investment Plan मध्ये तुम्हाला एका ठराविक वेळेत, ठराविक रक्कमेची गुंतवणूक करावी लागते. ह्यामुळे गुंतवणूकदारावर दबाव नसतो, व ते बिन्दास्त गुंतवणूक करू शकतात. Mutual Funds ला रिटर्नची मर्यादा नाही, कारण ती कितीही पटीत वाढू शकते. परंतु 12.5% च्या आधारे तुम्हाला रिटर्न मिळू शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही मिळू शकतो हे तर नक्की.
15 वर्षात कसे करोडपती व्हाल? SIP Calculator
Upstox च्या SPI गणितानुसार जर का एखादा गुंतवणूकदार दर महिन्याला SPI मध्ये 19,000 रुपयांची गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी करत असेल तर शेवटी maturity च्या वेळी नक्कीच त्याच्या जवळ 34,20,000 एवढी मोठी रक्कम असेल. या रकमेवर 12.5% व्याज दर जोडल्यास 66,38,880 रुपयांचा भारी भरभक्कम रिटर्न मिळू शकतो. या दोन्ही रकमा एकत्र केल्यास पंधराव्या वर्षी तुमच्याजवळ 1,00,58,880 एवढे रुपये असतील याचाच अर्थ तुम्ही करोडपती झालेले असाल.
काय आहे SIP Calculator?
SIP Calculator एक Virtual Device आहे, जो गुंतवणूकदाराला SIP च्या गुंतवणुकीवर कित्ती रिटर्न मिळू शकतो याचा अंदाज लावायला मदत करतो. एका फोर्मुलाचा वापर करुन इथे मिळणाऱ्या रकमेबद्दल अंदाज लावला जातो. SIP मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही योग्य चित्र समजून घेण्सायाठी या Calculator ची मदत घेतली जाऊ शकते.