SIP Investment : 10 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळतोय 1 कोटींचा रिटर्न; SIP गुंतवणूक ठरतेय आशेचा नवा किरण

SIP Investment :पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय असतात, कोणी पोस्ट ऑफिस स्कीमचा वापर करतो तर कोण म्युचुअल फंडची मदत घेतो. पैसे गुंतवताना सर्वात महत्वाचं काय आहे तर गुंतवलेले पैसे सुरक्षित असणे आणि त्यातून भलामोठा रिटर्न मिळवणे. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकीबद्दल अशीच एक कल्पना सुचवणार आहोत. कमीत कमीत पैसे गुंतवणूक करून कसा अधिकाधिक परतावा मिळवावा हे जाणून घेऊया. मध्यम वर्गीय लोकांसाठी अश्या कल्पना फारच सोयीस्कर ठरतात, पण कुठेही आणि कितीही पैसे गुंतवताना तो मार्ग सुरक्षित आहे का याची खात्री करावी…

SIP Investment म्हणजे काय?

SIP किंवा Systematic Investment Plan हि पैसे गुंतवण्याची एक आखणी आहे. म्युचुअल फंड्स तुम्हाला एका ठराविक काळासाठी, एक ठराविक रक्कम गुंतवण्याची संधी देतात. तुही तुमच्या सोयीनुसार एक महिन्यासाठी किंवा दीड महिन्यासाठी शक्य होईल तेवढी रक्कम गुंतवू शकता, हि रक्कम केवळ 500 रुपये सुद्धा असू शकते. या पैश्यातून तुम्ही नेट असेट वेल्यू (Net Asset Value) खरेदी करू शकता ज्याच्या अनुषंगाने फंड कडे असलेल्या स्टोक्स नुसार तुम्हाला परतावा दिला जातो. इथे जर का तुम्ही 10 हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरु केलीत तर दरवषी त्या रकमेत 10 टक्क्यांची वाढ करत तुम्ही पाच वर्षात 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा करू शकता.

SIP गुंतवणूक चांगली का?

SIP मध्ये गुंतवणूक केल्यामुळे (SIP Investment) दर महिन्याला तुम्ही ठरवलेली एक रक्कम तुमच्या खात्यातून कापली जाते, जी पुढे जाऊन गुंतवणुकीत बदलते. यामुळे काय होतं तर आपोआपच तुम्हाला पैसे गुंतवण्याची आणि साठवण्याची सवय तयार होते. अनेकवेळा हातात पैसे असले कि ते खर्च केले जातात, मात्र अश्या प्रकारची गुंतवणूक अवाजवी खर्च रोखण्यात मदत करते. तुम्ही जो पैसा कमावता तो काही अंशी साठवला जातो तर काही पैश्याने खर्चही भागवण सोपं होऊन जातं. कमीत कमी पैश्यांची गुंतवणूक करून सुद्धा तुम्हाला भला मोठा रिटर्न मिळवता येतो.