SIP Investment : हातात पैसे नसतील तर मग SIP मधील गुंतवणूक थांबवावी का?

SIP Investment । बचत करताना SIP म्हणजेच Systematic Investment Plan हा सर्वात चांगला उपाय मानला गेला आहे. इथे अमुक एका ठराविक वेळेत तुम्ही ठराविक रक्कमेची गुंतवणूक करत असता. तुम्ही ठरवलेली रक्कम आपोआपच कापली गेल्यामुळे सहजपणे पैसे गुंतवण्याची सवय लागायला मदत होते. आणि परीनामार्थी पैश्यांची बचत होते. म्युचुअल फंड,मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना हा पर्याय दिला जातो, आणि कमीत कमी वेळात जास्ती पैसे कमावण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. मात्र जर का एखाद्यावेळी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसतील तर? या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेऊया…

SIP Investment हप्ता चुकला तर?

SIP हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला गेला आहे. आणि गुंतवणूक करणाऱ्या माणसांना इथे (SIP Investment) मोठ्या प्रमाणात परतावा देखील दिला जातो. मात्र SIP आणि शेअर बाजार यांचे संधान असल्यामुळे, बाजारातील चढउतार याचा परिणाम गुंतवणुकीवर आपोआपच होतो. SIP मध्ये गुंतवणूक केल्यानंतर निश्चित तारखेला अधिकाऱ्याकडून पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट येते, मात्र जर का तुमच्या खात्यात पैसे नसतील तर Payment Default साठी बँक तुमच्याकडून दंडाची रक्कम घेऊ शकते. आणि सलग जर का SIPचा हप्ता चार महिन्यांसाठी चुकला तर तुम्ही पूर्ण गुंतवणूक बंद केली जाते. यानंतर तुम्ही इथे पैसे भरू शकत नाही, कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पैश्यांची रक्कम तुम्हाला नक्कीच मिळते पण त्यावरचा परतावा कमी झालेला असतो.

SIP कधी बंद करावी ?

SIP आणि शेअर बाजाराचा संबंध असल्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शेअर बाजाराची परिस्थती बिकट असताना SIPची गुंतवणूक थाबवावी. तसेच जर का तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील तर वेळेतच हि गुंतवणूक मागे घ्यावी. लक्ष्यात घ्या SIP पूर्णपणे थांबवणे हा चांगला पर्याय नाही तरीही तुम्हाला मिळणाऱ्या पर्ताव्यावर आजूबाजूच्या गोष्टींचा परिणाम होत नाही ना हे पाहून गुंतवणूक मागे घेण्याचा विचार करावा.