बिझिनेसनामा । सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आहे. आजकाल स्मार्टफोनचा वापरही खूप वाढलेला आहे. ज्यामुळे त्याच्या बॅटरीवर परिणाम होतो आहे. अनेक वेळा अचानक बॅटरी संपल्यामुळेही युझरला अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलो असताना फोन बंद झाला तर मोठी अडचण होते. यामुळे आता युझर्सकडून जास्त काळ बॅक देणाऱ्या फोनची मागणी केली जाते आहे. आजच्या या बातमीमध्ये आपण जास्त बॅटरी असलेल्या काही फोनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत…
Samsung Galaxy M13 : Samsung हा फोन Android 12 OS वर काम करतो. तसेच यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल कॅमेरे असतील. यासोबतच सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसरही दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी देखील दिली गेली आहे.
Samsung Galaxy M32 : Samsung च्या या फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच यामध्ये 6.4-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. या फोनमध्ये Octa-core MediaTek Helio G80 चा प्रोसेसरही आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी देखील दिली गेली आहे, जी 25W सपोर्ट देईल.
Realme Narzo 50A : Realme च्या या फोनमधील फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.5-इंचाचा HD + (720×1,600 पिक्सेल) वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले आहे, ज्याचा एस्पेक्ट रेशो 20: 9 आहे आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो 88.7% आहे. Realme च्या या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टची 6000mAh बॅटरी दिली गेली आहे.
Infinix Hot 12 : Infinix च्या फोनमध्ये प्लास्टिकची बॉडी दिली गेली आहे. यामध्ये 6.82-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रीफ्रेश रेट 90H आहे. तसेच त्याची स्क्रीन 180Hz टच सॅम्पलिंग रेट, 460 nits ब्राइटनेस आणि 90.66 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोला देखील सपोर्ट करेल. सुरक्षेसाठी याच्या मागच्या बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Tecno Pova 5G : Techno च्या या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाचा फुल HD + डिस्प्ले दिला गेला आहे, ज्याचे 1080×2460 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनचा प्रोसेसर octa-core MediaTek Dimensity 900 आहे. तसेच पॉवरसाठी या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देईल.