बिझनेसनामा ऑनलाईन । आज-काल सोशल मीडिया अकाउंट वरून एडवर्टाइजमेंट कॅम्पेन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याचबरोबर आजकाल लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून पैसे कमवण्यासाठी मदत घेत आहे. सोशल मीडियामुळे आता आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती, जगातील काही आश्चर्य, फिरण्यासाठी चे काही ठिकाण या सर्वांची माहिती कन्टेन्ट द्वारे मिळते. युजर्स ने टाकलेला कंटेंट आपण पाहत असतो. त्यानुसार बरेच जण पैसे कमवतात.
युट्युब आणि फेसबुक या प्लॅटफॉर्मवर एखादा कंटेंट तयार करून त्यावर व्हिडिओ किंवा ॲनिमेशन तयार करून टाकत असतात. त्याचबरोबर बरेच जण कन्टेन्ट बनवून एक कॉमेडी किंवा सिरीयल व्हिडिओ बनवून टाकतो. त्याचबरोबर हे व्हिडिओ आवडल्यास लोकांकडून शेअर देखील केले जातात. हा कंटेंट किंवा व्हिडिओ पाहणाऱ्यांची आकडेवारी प्रचंड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कंटेंट मुळे प्रचंड लोक स्वतःची कमाई करत आहे. अशा बऱ्याच ॲपवरून तुम्ही पैसे कमवू शकतात. त्यापैकी एक म्हणजेच स्नॅपचॅट. स्नॅपचॅट च्या माध्यमातून देखील तुम्ही पैसे कमवू शकतात. स्नॅपचॅटवर तुम्ही फोटोज व्हिडिओ स्टोरीज बनवून टाकू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स इफेक्ट, स्टिकर्स, टेक्स्ट,व्हॉइस व्हिडिओ यासारखे फीचर्स आहेत.
स्पॉटलाईट फिचर –
स्नॅपचॅट वरील स्पॉटलाईटमध्ये देखील स्मॉल व्हिडीओ बनवण्याचे फिचर्स उपलब्ध आहे. यामधून तुम्ही स्नॅप गिफ्ट मिळवू शकतात. हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात उत्तम व्हिडिओ स्नॅप स्पॉटलाईटवर पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला क्रिस्टल अवार्ड मिळू शकतो. त्यानुसार पैसे रिडिम केले जाऊ शकतात. यामधील पेमेंट वेगवेगळ्या पद्धतीने आणि फॅक्टर्सवर अवलंबून असते. त्याचबरोबर हे परफॉर्मन्स वर डिपेंडेड असते. त्यानुसार पेमेंट केले जाते.
स्पॉटलाईट द्वारे पैसे कमावण्यासाठी पात्रता–
जर तुम्ही स्पॉटलाईट मध्ये स्नॅप स्टार पासून स्नॅप क्रिस्टल साठी पात्र झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे माहिती मिळते. त्यानंतर तुम्हाला प्रोफाइलमध्ये दाखवले जाईल. त्यानुसार तुम्ही क्रिस्टल हब उघडण्यासाठी माय स्नॅप क्रिस्टल वर जाऊ शकतात. यानंतर पेमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला कम्युनिटी गाईडलाईन, स्पॉटलाईट गाईडलाईन, टर्म्स ऑफ सर्विसेस आणि स्पॉटलाईट टर्म या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतील.