Social Media Fraud । या आधुनिक जगात सोशल मिडीयाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालेला आहे. काही दिवसांपूर्वी जिथे केवळ Photo आणि Video शेअर केले जायचे आज त्याच सोशल मिडियाचा वापर करून अनेक वस्तूंची खरेदी विक्री केली जात आहे. किती तरी नवीन उद्योजक सोशल मिडीयाचा वापर करून घरबसल्या आपल्या वस्तूंची विक्री करीत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच सोबत तोटे देखील असतात. आणि सोशल मिडियाच्या बापतीत असे अनेक अनुभव आपल्याला आलेले आहेत, पण म्हणून ती गोष्ट वाईट असते असं मुळीच नाही. त्याचा वापर चुकीच्या मार्गांनी आणि चुकीची उद्दिष्टे पूर्ण करायला केला गेल्याने बाकी सर्व चांगल्या घटकांवर पडदा पडतो, आज सोशल मिडियाच्या संधार्बत एक मोठा गुन्हा (Social Media Fraud) उघडकीस आलेला आहे, तो काय हे जाणून घेऊया…
आयकर विभागाने पकडली सोशल मिडीयावरची चोरी: (Social Media Fraud)
गेल्या तीन वर्षात फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करून सुमारे 10 हजार कोटी रुपयांची करचोरी केलेली आढळून आली आहे. हि मंडळी एकतर कर भरत नव्हती किंवा कमी कर भारत होती अशी माहिती विभागाने दिली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी हि चोरी केलेली असून आयकार विभागाने अश्या 45 ब्रँड ना आत्तापर्यंत नोटीस पाठवलेली आहे तसेच यामध्ये अजून अनेक ब्रँडचा समावेश होणार असल्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत आयकर विभागाला 10 हजार कोटी रुपयांच्या कर चोरीची माहिती मिळालेली आहे. आणि म्हणूनच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत अश्या गुन्हेगारांच्या नावे नोटीस जारी करण्यात आली. घडलेल्या प्रकारमुळे आयकर विभाग डोळ्यात तेल घालून सोशल मिडीयावर चालणाऱ्या व्यवसायांवर नजर ठेऊन असणार आहे.
काय म्हणतोय आयकर विभाग:
घडलेल्या प्रकाराबद्दल आयकार विभाग सांगतो कि या कर चोरीमध्ये कोणत्याही मोठ्या कंपनीचा हात नाही. गुन्हा दाखल झालेल्या 45 ब्रेंड पैकी 17 कपड्यांची विक्री करतात, 11 ज्वेलरी तर 6 जण शूज आणि बॅग्जचा व्यवसाय करत आहेत. इतर काही अंशी ब्रेड हे फॅशन प्रोडक्ट आणि होम डेकोर आणि फर्निशिंगची विक्री करतात (Social Media Fraud). यापैकी काही विक्रेते परदेशातून हा व्यापार करीत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली असून येत्या काही दिवसांतच इतर नावं समोर येतील.