Social Security Schemes । भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा समोर आणली आहे. ज्याद्वारे SBI मधील सामाजिक सुरक्षा योजनेत नोंदणी करणे अधिक सोपे झाले आहे. आता फक्त आधार कार्ड दाखवून SBI च्या कुठल्याही सामाजिक सुरक्षा योजनेसाठी तुम्ही नोंदणी करू शकता.
पासबुकची आवश्यकता नाही :
यापूर्वी या योजनेचा (Social Security Schemes) लाभ घेण्यासाठी बँकेचे पासबुक व तत्सम अन्य कागदपत्रांची आवश्यकता होती. आता मात्र ह्या कागदपत्रांची कोणतीही आवश्यकता नसून फक्त आधार कार्डचा वापर करून तुम्ही सामाजिक सुरक्षा योजनेसाठी आपली नोंदणी करू शकता.
ग्राहक सेवा केंद्रावर करू शकता नोंदणी :
बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा यांनी नवीन ग्राहक सेवा केंद्राच्या अनावरणावेळी सांगितले की कुठल्याही ग्राहक सेवा केंद्रावर आधार कार्ड दाखवून तुम्ही या योजेनेचा लाभ घेऊ शकता . SBI काढलेल्या प्रेस नोटमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा योजना : Social Security Schemes
1)प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) :
ही एक वर्षाची जीवन विमा योजना आहे जी कोणत्याही कारणामुळे मृत्यूपासून संरक्षण देते. 2 लाख रुपयांचे आयुर्विमा संरक्षण केवळ 436 रुपये प्रतिवर्ष प्रीमियमवर उपलब्ध आहे.
2)प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY):
एक वर्षाची अपघात विमा योजना आहे जी अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण देते.
3) अटल पेन्शन योजना (APY):
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षांनंतर किमान एक हजार ते पाच हजार मासिक पेन्शन मिळते.