बिझनेसनामा । गेल्या काही काळापासून शेअर बाजारात (Share Market) प्रचंड चढ -उतार दिसून येत आहे. आज वर असणारा बाजार दुसऱ्या दिवशी अचानक कोसळल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. मात्र असे असूनही शेअर बाजारातील काही कंपन्यांचे शेअर्स मल्टिबॅगर म्हणून (Multibagger Stock) उदयास आले आहेत. यामध्ये सोमानी सिरॅमिक्स (Somany Seramics) या प्रीमियम टाइल्स (Tiles) बनवणाऱ्या कंपनीचे नाव देखील सामील आहे. या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांना मोठा नफा मिळवून दिला आहे. मजबूत रिटेल डिस्ट्रीब्यूशन, प्रोडक्ट मिक्सिंगमध्ये सुधारणा आणि वर्किंग कॅपिटलबाबत सक्ती यासारखी पावले उचलल्यामुळे गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या व्यवसायामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
या आर्थिक वर्षांमध्ये हे शेअर्स सुमारे 43 टक्क्यांनी खाली आले आहेत. मात्र, असे असले तरीही बाजारातील तज्ज्ञ या शेअर्समध्ये आणखी 40 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे मत व्यक्त करत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म असलेल्या एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) देखील सोमाणी सिरॅमिक्सच्या शेअर्सबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या जून तिमाहीत 20 टक्के क्षमतेच्या विस्तारामुळे कंपनीची वाढ आणखी मजबूत राहील अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे.
740 रुपयांची टारगेट प्राइस निश्चित
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने या शेअर्ससाठी 740 रुपयांची टारगेट प्राइस निश्चित केली आहे. जी सध्याच्या किंमतीपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त आहे. हे लक्षात घ्या कि, 11 नोव्हेंबर रोजी BSE वर सोमाणी सिरॅमिक्सचे (Somany Seramics) शेअर्स 528.70 रुपयांच्या किंमतीवर बंद झाले. 23 जानेवारी 2009 रोजी 8.40 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 528.70 रुपयांच्या पातळीवर आहेत. जर एखाद्याने जानेवारी 2009 मध्ये यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 63 पटीने वाढून 63 लाख रुपये झाले असते.
आणखी वाढ होण्याची अपेक्षा
गॅस महागल्यामुळे या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोमानी सिरॅमिक्सच्या (Somany Seramics) शेअर्सच्या व्हॉल्यूम आणि मार्जिनमध्ये किरकोळ प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. मात्र तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 या सहामाहीत या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोमाणी सिरॅमिक्सच्या शेअर्सविषयी जाणून घ्या
सुमारे एक वर्षापूर्वी, 17 नोव्हेंबर 2021 रोजी, सोमानी सिरॅमिक्सचे शेअर्स 952.45 रुपयांच्या पातळीवर होते, जो संपूर्ण वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. यानंतर, शेअर्सच्या विक्रीमुळे, 23 जून 2022 रोजी, 46 टक्क्यांच्या घसरणीसह, तो 512.50 रुपयांवर आला. या चढ-उतारांदरम्यान या शेअर्समध्ये सुमारे 3% रिकव्हरी झाली. यानंतर तज्ञांच्या मते, त्यामध्ये आणखी तेजीचा कल असल्याचे सांगितले जाते आहे.