बिझनेसनामा ऑनलाईन । क्रिकेटच्या मैदानात नाव कमावल्यानंतर दादा, म्हणजेच सौरव गांगुली आत्ता बिझनेसचं (Sourav Ganguly Steel Plant) मैदान गाजवण्याच्या पूर्ण तयारीत आहे. सौरव गांगुली हा भारताचा माजी आणि यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक सामने जिंकले होते. व जगात भारतीय क्रिकेट संघाचे नाव रोशन केलं तोच गांगुली आता व्यवसायाच्या क्षेत्रात उतरला असून पश्चिम बंगाल मध्ये स्टीलचा कारखाना काढणार आहे. पश्चिम बंगालच्या पश्चिम मोदिनिपूरमध्ये शाल्बनीत दादा हा बिझनेस सुरु करणार आहे. या जागेवर तो स्टीलची फेक्टरी उभी करणार आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार पुढच्या पाच – सहा महिन्यांत कंपनीचं सगळं काम पूर्ण होणार आहे.
2007 मध्ये या बिझनेसची केली होती सुरुवात: Sourav Ganguly Steel Plant
येत्या पाच सहा महिन्यांत सुरु होणाऱ्या या बिझनेसची सुरुवात (Sourav Ganguly Steel Plant) खरं तर वर्ष 2007 मध्ये झाली होती. आणि आता याच कंपनीचा तिसरा प्लांट सौरभ गांगुली सुरु करणार आहे. ५-६ महिन्यांत हा प्लांट तयार होईल असं गांगुलींच म्हणण आहे, बंगाल ग्लोबल बिझनेस समीटमध्ये बोलताना त्याने हि घोषणा केली. या आधी देखील सौरव गांगुलीचे आजोबा बिझनेस करत असत.
क्रिकेटच्या मैदानात चालली दादागिरी
सौरभ गांगुली भारताचा यशस्वी कॅप्टन आहे. गांगुली त्याच्या आक्रमक बाण्यासाठी ओळखला जातो. गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारताने दुसऱ्या देशातही सामने कसे जिंकायचे ते शिकला. वर्ष 2003 मध्ये गांगुलीच्या नेतृवाखाली भारत विश्व कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. या नंतर गांगुली यांनी BCCIचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले होते. आत्ता व्यवसायाच्या क्षेत्रात तो किती नाव कमवू शकतात याकडे अनेकांच्या नजरा राखून आहेत.