Sovereign Gold Bond: तुम्हालाही सोने खरेदी करायचे आहे, पण वाढत्या दरांमुळे तुम्ही अडचणीत आहात? तर आता मुळीच काळजी करू नका, कारण भारत सरकारने तुमच्यासाठी “सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2023-24” सुरू केली आहे. या योजने अंतर्गत तुम्ही बाजारभावापेक्षा कमी दरात सोने खरेदी करू शकता.
ही योजना नेमकी काय आहे? (Sovereign Gold Bond)
भारत सरकारने ‘सोव्हेरिन गोल्ड बॉण्ड योजना’ नावाची एक योजना सुरू केली आहे आणि या योजनेंतर्गत तुम्ही बाजारापेक्षा कमी किंमतीत सोन्यात गुंतवणूक करू शकता. इथे गुंतवणूक का करावी तर, भारत सरकार तुम्हाला गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी देते. तसेच कोणत्याही बँकेतून किंवा नेट बँकिंगद्वारे सोन्याची खरेदी करता येते. लक्ष्यात घ्या ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे चालवली जाणारी योजना असल्याने तुम्हाला गुंतवणुकीबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, तुम्ही जर या योजनेत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकता. हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) 4 किलो पर्यंत सोने खरेदी करू शकते आणि एखाद्या ट्रस्टच्या अंतर्गत 20 किलो पर्यंत सोने खरेदी करण्याची परवानगी दिली गेली आहे.
या योजनेत गुंतवणूक कुठे करावी?
तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास, तुम्ही सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना (Sovereign Gold Bond) खरेदी करू शकता. हे बाँड तुम्ही अनेक ठिकाणांहून खरेदी करू शकता जसे की तुमची बँक, स्टॉक एक्सचेंज, आणि इतर अधिकृत संस्था.