Sovereign Gold Bond Scheme योजनेचा पहिला रिटर्न जारी; गुंतवणूकदार झाले मालामाल

Sovereign Gold Bond Scheme : वर्ष 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताच्या व्यवस्थेची सूत्र हाती घेतली. पाच वर्ष उत्तम कामगिरी बजावल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची देशाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. मोदींनी सत्ता धारण केल्याच्या एक वर्षानंतर देशातील सर्वोच्च बँक म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने सोन्याची गुंतवणूक करण्यात इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना अंमलात आणली. जिचे नाव सॉवरेन गोल्ड बॉंड असे आहे. ही योजना बाजारात येण्याआधी सोन्याची गुंतवणूक म्हणजे महागाईचं काम असं समजलं जायचं. मात्र सॉवरेन गोल्ड बॉंड यांनी सोन्याची गुंतवणूक देखील स्वस्तात करता येते याची खात्री देशातील नागरिकांना पटवून दिली. सध्या भारतात लग्नसराईचा मौसम सुरू असल्यामुळे अनेक जण सोन्याच्या दुकानांमध्ये धाव घेत असतील, तसेच योजनेचा पहिला हप्ता आत्ताच जारी करण्यात आला आहे म्हणूनच या योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया….

सॉवरेन गोल्ड‌ बॉंडने दिला आकर्षक रिटर्न:(Sovereign Gold Bond Scheme)

वरती नमूद केल्याप्रमाणे सॉवरेन गोल्ड बॉंड ही बाजारात सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये करता येणारी सर्वात स्वस्त अशी गुंतवणूक आहे. योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2.75% असा ठरलेला रिटर्न दिला जातो आणि योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा कालावधी हा आठ वर्षांचा आहे. यावर्षी नोव्हेंबर 30 रोजी सदर योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्यात आला आणि योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व लाभार्थ्यांना यावेळी 12.9 टक्क्यांनी व्याज देण्यात आलं.

लाभार्थ्यांना मिळालेल्या व्याजामध्ये 12.9 टक्के वार्षिक रिटर्न तसेच 2.75 टक्के निश्चित व्याज सामावलेला होता. यामुळेच लाभार्थी वर्गाला योजनेतून (Sovereign Gold Bond Scheme) भरपूर फायदा कमावयाची संधी मिळाली. योजनेमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करण्याची संधी वर्ष 2015 मध्ये देण्यात आली होती, जेव्हा 2600 रुपये प्रति ग्राम सोन्यावर गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होता. कालावधी पूर्ण झाल्यानंतर याता गुंतवलेल्या रकमेची किंमत 6132 रुपये झालेली आहे. सदर योजनेबाबत RBIने दिलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये एकूण 245 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

ही योजना महत्त्वाची कशाला?

गोल्डनपीचे CEO अभिजीत रॉय यांच्या मते देशाच्या नागरिकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक न करता गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. याचं प्रमुख कारण म्हणजेच गोल्ड बॉंड तुम्हाला चांगल्यातल्या चांगला परतावा मिळवून देऊ शकतात. तसेच इथे इतर कुठल्याही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर देखील तुम्हाला सोन्या एवढेच पैसे परत मिळतील पण याची एक विशेषता म्हणजे इथे तुम्ही डिमॅट अकाउंटचा वापर करून सुद्धा गोल्ड बॉंडची खरेदी करू शकता.

सॉवरेन गोल्ड बॉंड (Sovereign Gold Bond Scheme) मध्ये तुम्हाला 2.75 टक्क्यांचा रिटर्न सोडल्यास बाकी करावर सूट दिली जाते. तसेच ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्या माणसाला प्रति ग्राम सोन्यावर 50 रुपयांची सूट मिळते. योजनेची आणखीन एक विशेषता म्हणजे इथे गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी पाच वर्ष वाट पाहण्याची गरज नाही, तुमच्या मर्जीप्रमाणे कधीही तुम्ही गुंतवलेली रक्कम परत मिळवू शकत. टॅक्स स्लॅबच्या आधारे जर का 3 वर्षांच्या आत तुम्ही गुंतवणुकीची रक्कम मागे घेणार असाल तर यावर ITGC लागू होईल आणि जर का तुम्ही 8 वर्षांच्या आधी आणि 3 वर्षांनंतर रक्कम मागे घेणार असाल तर यावर 20 टक्क्यांचा लॉन्ग कॅपिटल बेनिफिट मिळेल.