SpiceJet Flights To Ayodhya : देशभरात सध्या राम मंदिर उद्घाटनाची चर्चा सुरू आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून अनेक भक्तांना तसेच पर्यटकांना बदललेल्या अयोध्येचे स्वरूप पाहायचं आहे आणि श्रीरामांच्या विराजित मूर्तीचे दर्शन घ्यायचे आहे. दरम्यान या सर्व प्रवाशांसाठी प्रवास सुखकर व्हावा म्हणून वेगवेगळ्या शहरांमधून विमान सेवा सुरू करण्यात येईल. काही दिवसांपूर्वी इंडिगो आणि एअर इंडियाकडून अयोध्यासाठी उड्डाण घेणाऱ्या विमानाबद्दल माहिती देण्यात आली होती आणि आता याच्यात प्रसिद्ध विमान कंपनी म्हणजेच स्पाइसजेट (SpiceJet) हे देखील नाव सामील झाले आहे. काल म्हणजेच शुक्रवारी SpiceJet ने आपल्या ग्राहक वर्गाला एकूण आठ मार्गांनी अयोध्येला उड्डाण घेणाऱ्या विमानाबद्दल माहिती पुरवली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून ही सर्व विमानं अयोध्येसाठी उड्डाण घेतील.
अयोध्यासाठी SpiceJet ची विमानसेवा: (SpiceJet Flights To Ayodhya)
इंडिगो (Indigo) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) नंतर आता SpiceJet ने सुद्धा अयोध्येसाठी विमानं रवाना करण्याची जबाबदारी उचलली आहे. दिल्ली, अहमदाबाद, जयपुर, पटना, दरभंगा, चेन्नई, मुंबई आणि बेंगलोर या आठ विविध प्रदेशांमधून कंपनीची विमानं अयोध्येसाठी उड्डाणं घेतील. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या कंपनीने दिल्लीतून अयोध्येसाठी 21 जानेवारी रोजी होणाऱ्या स्पेशल फ्लाईट संचालनाबद्दल माहिती दिली होती. सर्व रामभक्तांना अयोध्येत होणाऱ्या अभूतपूर्व कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून 21 जानेवारी रोजी कंपनीकडून ही विशेष सेवा दिली जाणार आहे.
‘या’ विमान कंपन्या देखील पुरवणार विमानसेवा:
शिवाय काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेस (Air India Express) ने सुद्धा देशातील काही शहरांमधून अयोध्येसाठी घेतल्या जाणाऱ्या विमान उड्डाणांबद्दल माहिती दिली होती. इंडिगो (Indigo) ही विमान कंपनी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथून अयोध्येसाठी विमानांची आखणी करणार आहे तर दुसऱ्या बाजूला एअर इंडिया एक्सप्रेस(Air India Express) दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथून विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे (SpiceJet Flights To Ayodhya).
अकासा एअर(Akasa Air) ही कंपनीदेखील आता मागे नसून त्यांनी अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. पर्यटक अकासा एअर (Akasa Air) सेवेद्वारे पुण्यातून अयोध्येसाठी प्रवास करू शकतील, मात्र ही विमानसेवा पुणे ते अयोध्या वाया दिल्ली या मार्गाने प्रदान केली जाईल. अकासा कंपनीकडून 15 फेब्रुवारीपासून हे विमानसेवा सुरू करण्यात येईल, पुण्यातून 8:50 वाजता उड्डाण घेणारी ही विमानं 12:55 मिनिटांनी अयोध्येत पोहोचणार आहेत.