SpiceJet News: ‘ही’ विमान कंपनी घेणार नवीन भरारी; Busy Bee शी हात मिळवणी करून लावली बोली

SpiceJet News: स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह आणि Busy Bee एअरवेज यांनी मिळून Go First साठी बोली लावली आहे. लक्ष्यात घ्या या बोलीमध्ये भारतीय विमान क्षेत्राचे स्वरूप बदलण्याची क्षमता आहे आणि ही बोली स्पाइसजेटला उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढीसाठी स्थान मिळवून देऊ शकते, असे एअरलाइनने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

SpiceJetसाठी ही बोली महत्वाची: (SpiceJet News)

अजय सिंह यांनी Busy Bee एअरवेजसोबत मिळून Go First साठी बोली लावली आहे. ही बोली भारतीय विमान क्षेत्राचे स्वरूप बदलू शकते आणि स्पाइसजेटला आणखी मोठे बनण्याची संधी देऊ शकते. ही बोली जर का यशस्वी ठरली तर स्पाइसजेट नव्या विमान कंपनीला चालवण्यात मदत करेल. त्यामुळे दोन्ही कंपन्यांना एकत्रितपणे काम केल्याने खर्च कमी होईल, जास्त लोकं या विमान कंपनीच्या मदतीने प्रवास करतील आणि परिणामी त्यांची बाजारपेठ मजबूत होईल.

सध्या स्पाइसजेट पुन्हा उभारी आण्यासाठी प्रयत्न करत आहे(SpiceJet News). त्यांनी आतापर्यंत 744 कोटी रुपयांची गुंतवणूक उभारली असून, आणखी काही गुंतवणूकदारांच्या मंजुरीची वाट पाहत आहेत. इतकेच नाही तर कंपनी 1000 कोटी रुपये उभारण्याच्या प्रयत्नात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आधीच झालेल्या बैठकीमध्ये गुंतवणूकदारांनी 2500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे, त्यामुळे पुन्हा त्यांची परवानगी घेण्याची गरज नाही. सोबतच, नियमावलीच्या मान्यतेनंतर आणखी गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे.