SpiceJet News: स्पाइसजेटने काही शेयर विकून 316 कोटी रुपये जमा केले आहेत, यामुळे त्यांची एकूण जमा रक्कम 1060 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. हे पैसे जमा होत असतानाच, स्पाइसजेटने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 10 ते 15 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितले की, “कंपनीने एकूण 1060 कोटी रुपये जमा केले आहेत. ही मोठी गुंतवणूक स्पाइसजेटच्या विकास क्षमतेवर गुंतवणुकदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे आणि भविष्यासाठी आमची आर्थिक स्थिती मजबूत करते.”
SpiceJet ला मिळतेय आर्थिक मदत: (SpiceJet News)
स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी घोषणा केली आहे की कंपनीने यशस्वीरित्या 1060 कोटी रुपये उभारले आहेत. या मोठ्या गुंतवणुकीचा अर्थ काय होतो तर अनेक गुंतवणूकदारांचा कंपनीवर फार विश्वास आहे, आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा आर्थिक व्यवहार केला आहे. या गुंतवणुकीमुळे स्पाइसजेटला नवीन विमाने खरेदी करण्यास, तिचे मार्ग जाळे विस्तृत करण्यास आणि तिची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. परिणामी येणाऱ्या काळात कंपनी ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा आणि कमी किमतीत विमान प्रवास देऊ शकेल. स्पाइसजेट भारतातील सर्वात स्वस्त विमान कंपन्यांपैकी एक आहे आणि या गुंतवणुकीमुळे त्यांची बाजारपेठेतील स्थिती मजबूत करण्यास मदत होईल.
कंपनीला जानेवारीमध्ये 900 कोटी रुपयांचा भरगोस निधी मिळाली होता. पाहायला गेलं तर ही विमान कंपनी अनेक दिवसांपासून आर्थिक संकटातून जात होती आणि म्हणूनच या निधीचा उपयोग करून कंपनी आपल्या विमानांच्या ताफ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करेल(SpiceJet News). विमान कंपनीच्या मते, 900 कोटी रुपयांहून अधिक रकमेमध्ये सरकारकडून इमर्जन्सी क्रेडिट लाइन गारंटी योजना (ECLGS) अंतर्गत 160 कोटी रुपये हप्त्यामध्ये समाविष्ट आहेत.