SpiceJet Shares: या प्रसिद्ध विमान कंपनीचे शेअर्स कोलमडले; 10 टक्क्यांच्या घसरणीचे काय आहे कारण?

SpiceJet Shares: आजच्या बाजारी दिवसांत एक महत्वाची घडामोड झाली, SpiceJet च्या शेअर्समध्ये आज घसरण झाली आहे. माध्यमांना मिलेल्या माहितीनुसार आज कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली असून नवीन आकडा 54.60 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. मिळालेली माहिती सांगते की कंपनीमधल्या दोन अनुभवी अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळेच हा प्रसंग ओढवला आहे.

का दिला अधिकाऱ्यांनी राजीनामा? (SpiceJet Shares)

SpiceJet कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचं प्रमुख कारण ठरलं वृत्तपत्रात चर्चेत आलेली ‘सिरीयस इंडिया एअरलाइन्स’ (Sirius India Airlines) ही विमान कंपनी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SpiceJet चे मुख्य कार्यवाह अधिकारी अरुण कश्यप (Arun Kashyap) आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया (Shilpa Bhatia) यांच्या जोडीदारांनी विमान क्षेत्रात नवीन कंपनी सुरू केली. ही गोष्ट कंपनीच्या दृष्टीने धोकादायक ठरली, कारण एकाच क्षेत्रात स्पर्धा करणं कंपनीच्या हिताचं नसल्याचं स्पष्ट झाल्याने या दोघांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. शिवाय बाकी अनेक कारणांमुळे कंपनीला सोडून मंडळी दुसरीकडे जात आहेत.

कंपनीचे शेअर्स घसरले?

शेअरच्या किमतीत गेल्या पाच दिवसांत 11 टक्क्यांची घसरण झाली आहे(SpiceJet Shares). पण गुंतवणूकदारांनी निराश होण्याची गरज नाही कारण गेल्या सहा महिन्यांत गुंतवणूदारांना तब्ब्ल 40 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे, एवढंच नाही तर गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर कंपनीने गुंतवणूकदारांना 28 टक्क्यांचा परतावा दिला आहे.