SpiceJet Shares: बजेट एअरलाइन SpiceJet साठी एक आनंदाची बातमी आहे. अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) यांनी खुल्या बाजारातून SpiceJet चे शेअर्स खरेदी केले आणि एयरलाइनच्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. एयरलाइनच्या एका अधिकाऱ्यानुसार, SpiceJet मधील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) हिस्सेदारी 5.88 टाक्यांनी वाढली आहे. डिसेंबर 2023 मध्ये ही हिस्सेदारी 0.33 टक्के होती, जी फेब्रुवारी 2024 मध्ये 6.21 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ADIA ही जगातील सर्वात मोठ्या Sovereign Wealth Fund पैकी एक असून या गुंतवणुकीमुळे SpiceJet ला आर्थिकदृष्ट्या मजबूती मिळेल आणि त्याच्या विस्तार योजनांना चालना मिळेल.
SpiceJet ला मिळाली परदेशी ऑफर: (SpiceJet Shares)
स्पाइसजेटने एरीज अपॉर्चुनिटीज फंड लिमिटेड आणि एलारा इंडिया अपॉर्चुनिटीज फंड लिमिटेड सारख्या काही गुंतवणूकदारांसोबत Preferential Issue द्वारे 1060 कोटी रुपये जमा केले. या रकमेचा उपयोग विमानाच्या भाड्यासाठी देय रक्कम भरणे, विमान खरेदी करणं आणि कर्जाची परतफेड करणं यासाठी केला जाईल. SpiceJet चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, “या गुंतवणुकीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्यातील वाढीसाठी आवश्यक असलेले भांडवल मिळेल.”
गेल्या 28 फेब्रुवारीला, SpiceJet आणि एयरकॅप यांच्यातील 250 कोटी रुपयांचा वाद संपल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. एयरकॅपच्या सहाय्यक कंपनी, सेलेस्टियल एविएशनसोबत झालेल्या चर्चेतून हा वाद मिटवण्यात आला.
SpiceJet च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला भरगोस परतावा:
गेल्या 6 महिन्यांत SpiceJetच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 3 महिन्यांत स्टॉक रिटर्न 35.22 टक्के आणि 1 वर्षात 72 टक्क्यांनी वाढला आहे (SpiceJet Shares). 4 मार्च रोजी स्टॉक 1.50 टक्क्यांवरून घसरून 62.58 च्या पातळीवर बंद झाला. कंपनीचे बाजारमूल्य 4,282.59 कोटी झाले आहे.