SpiceJet Special Flights : रामकार्यात SpiceJet चा ‘खारीचा वाटा’; 21 तारखेला भक्तांना देणार खास विमानसेवा

SpiceJet Special Flights : गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आता 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा आपल्या देशभरात अगदी दिवाळी प्रमाणे साजरा केला जाईल आणि या सोहळ्याचे भागीदार बनण्यासाठी देशभरातून कित्येक लोकं अयोध्येच्या मार्गावर असणार आहेत. राम भक्तांची हीच ओढ पाहून SpiceJet या विमान कंपनीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष उड्डाण सेवांची घोषणा केली आहे. 21 जानेवारी 2024 रोजी दिल्लीतून अयोध्येसाठी स्पेशल फ्लाइट्सची सुरुवात करण्यात येईल. राम भक्तांना या अभूतपूर्व सोहळ्याचा प्रत्यक्षपणे लाभ घेता यावा म्हणून कंपनीकडून ही सेवा प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्पाइस जेटने कार्यक्रमानंतर सर्व भक्तांना पुन्हा एकदा सुखरूप घरी परत आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अयोध्येसाठी स्पाइसची स्पेशल विमानसेवा: (SpiceJet Special Flights)

22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याला अनेक भक्तांना सहभागी होण्याची इच्छा आहे. आणि त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी स्पाइस जेटने अयोध्या स्पेशल फ्लाइट्स च्या अंतर्गत काही विशेष विमानांची दिल्ली ते अयोध्या प्रवासासाठी नियुक्ती केलेली आहे. ही विमानं दिल्लीतून दुपारी 1:30 वाजता उड्डाण करतील, जी 3:00 वाजेपर्यंत महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहेत. 22 जानेवारीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर हीच विमानं पुन्हा एकदा प्रवाशांना घेऊन संध्याकाळी 5:00 वाजता दिल्लीसाठी रवाना होतील आणि संध्याकाळी 6:30 वाजता विमानं दिल्लीत उतरतील.

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे “अयोध्येत होणाऱ्या होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. या अनन्यसाधारण कार्यक्रमाचा भाग बनणाऱ्या भक्तांना तसेच यात्रेकरूंना प्रवासाची सेवा उपलब्ध करून देऊ आम्ही एका प्रकारे यात योगदान देत आहोत” (SpiceJet Special Flights) आणि याचाच कंपनीला अभिमान वाटत आहे.

Indigo देखील देणार अयोध्येसाठी विमानसेवा:

इंडिगोने काही दिवसांपूर्वीच आयोध्यासाठी विमानं रवाना करण्याची घोषणा केली होती. इंडिगो विमान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या आधारे 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येला जाणाऱ्या विमानांची तिकीट 15,193 प्रती प्रवासी अशी असतील. इंडिगोची विमानं दुपारी 12:45 वाजता दिल्लीतून अयोध्येसाठी रवाना होतील आणि अयोध्येत दुपारी 2:00 वाजता या विमानांना उतरवण्यात येईल. शिवाय इंडिगोने अहमदाबाद आणि मुंबईतून देखील अयोध्येसाठी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना विमान सेवा पुरवण्याचा निश्चय केला आहे.