SpiceJet Special Offer: स्वस्तात करा अयोध्या आणि लक्षद्वीपचा विमान प्रवास; ही कंपनी देणार खास सवलत

SpiceJet Special Offer : आत्ताच्या घडीला भारतात दोनच विषय सर्वात प्रचलित आहेत, एक म्हणजे अयोध्येतील राम मंदिर आणि दुसरा म्हणजे लक्षद्वीप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीव मधील तीन मंत्र्यांनी विधान केल्यानंतर भारत आणि मालदीवचे संबंध खराब झाले. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या बॉयकॉट मालदीव(Boycott Maldives) या मोहीम नंतर अनेक पर्यटकांनी मालदीवची तिकिटं रद्द केली. एवढंच नाही तर देशातील विविध ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपन्यांनी देखील या अभियानात नेटकऱ्यांची साथ दिल्याने संपूर्ण अभियानाला वेगळीच मजबुती मिळाली. या संपूर्ण प्रकरणानंतर मालदीववरून पर्यटकांचे लक्ष हटले सून आता सर्वांचे आकर्षण लक्षद्वीपप्रती वाढले आहे.

दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिर हा भारतात सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांना श्रीरामांना अयोध्येत विराजमान होताना बघण्याची इच्छा आहे, अयोध्येत तयार होत असलेलं भव्य मंदिर समोरून पाहण्याची आणि तो सोहळा अनुभवण्याची इच्छा सर्व राम भक्तांना अयोध्येकडे आकर्षित करत आहे. देशात घडणाऱ्या या दोन महत्त्वाच्या घटनांमुळेच अयोध्या आणि लक्षद्वीपला जाणाऱ्या विमान सेवांची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेता स्पाइसजेटचे चेअरमन आणि सीईओ अजय सिंह यांनी एक विशेष घोषणा केली होती.

स्पाइसजेटच्या चेअरमनची विशेष घोषणा: (SpiceJet Special Offer)

पर्यटकांचा अयोध्या आणि लक्षद्वीप या दोन स्थळांप्रति वाढते आकर्षण पाहता, स्पाइसजेट या विमान कंपनीचे चेअरमन आणि सीईओ अजय सिंह यांनी लवकरच कमीत कमी किमतीत लक्षद्वीपसाठी विमान सेवा सुरू करण्याची (SpiceJet Special Offer) माहिती दिली आहे. मात्र केवळ लक्षद्वीपच नाही तर अयोध्येला देखील परवडणाऱ्या पैशांमध्ये पर्यटकांसाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती त्यांनी काल AGM च्या बैठकीत सादर केली.

देशातील सगळ्या विमान कंपन्यांची एक वार्षिक बैठक होत असते (Annual General Meeting). याच बैठकीत अजय सिंग यांनी बुधवारी कंपनीच्या भागधारकांना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवड्यात लक्षद्वीपला केलेला दौरा आणि परिणामी भारत आणि मालदीव यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर लक्षद्वीप या बेटाच्या सर्व्हिस व्हॉल्यूममध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, पर्यटकांमध्ये लक्षद्वीपला जाण्यासाठी विमानांची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेता, एअरलाइन्स कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत अधिकार वापरून या केंद्रशासित प्रदेशात त्यांची उड्डाणे सुरू करण्यात येतील (SpiceJet Special Offer). यासोबतच अयोध्येला जाणाऱ्या विमानांची मागणी पाहता येथूनही लवकरच विमानसेवा सुरू करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अयोध्या आणि लक्षद्वीप या दोन नवीन मोहिमांबद्दल बोलताना त्यांनी गुंतवणूकदारांना स्पाइस जेट या कंपनीमध्ये आलेल्या तेजीची माहिती दिली. त्यांच्या मतानुसार स्पाइस जेट ही विमान कंपनी 2,250 कोटी रुपये वापरून विमानसेवा अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि या मोठ्या गुंतवणुकीमुळे नक्कीच कंपनीला अधिक सक्षम होण्यात मदत मिळत आहे.