Spotify Layoffs : आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो असताना मागच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जातोय. यंदाच्या वर्षात आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. आता प्रसिद्ध अशा Spotify कंपनी सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांना कायमचा रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे. वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना कंपनी नेमक्या कोणत्या कारणाने कर्मचाऱ्यांची कपात करत आहे हे जाणून घेऊया…
Spotify करतोय कर्मचाऱ्यांची कपात:(Spotify Layoffs)
Spotify हि म्युझिक कंपनी जगभरातून पसंत केली जाते, मात्र वर्षाच्या शेवटी कंपनी जवळपास 17 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहे. या टाळेबंदीचा एकाच उद्देश म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या आटोक्यात ठेवणे आणि भविष्यातील उद्दिष्टांशी जुळवून घेणे असा आहे. सध्या आर्थिक वाढ देखील मंदावलेली असल्यामुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती CEO नी माध्यमांना दिली.
पदाधिकारी म्हणाले कि कपात करणे हि कंपनीची सध्याची गरज असली तरीही यामुळे आम्ही अनेक हुशार, मेहनती आणि प्रतिभावान लोकांना कायमचे गमावणार आहोत. कंपनीच्या 17 टक्के म्हणजे अंदाजे 1,500 कर्मचाऱ्याना कायमचा रामराम करावा लागणार आहे. याआधी सुद्धा जानेवारी महिन्यात 600 आणि जून महिन्यात 200 कर्मचाऱ्यांची कपात (Spotify Layoffs) कंपनीकडून करण्यात आली होती. कंपनीच्या CEO नी सर्वांचे आभार मानले आहेत, आजपर्यंत तुमच्या कामाने तुम्ही सर्वांवर प्रभाव टाकला आहे असेही ते म्हणले आणि शेवटी काम सोडून जाणाऱ्या सर्वांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
काय म्हणाले कंपनीचे CEO ?
कंपनीचे CEO डेनियल एक म्हणतात कि सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीच्या HR कडून एक केलेंडर संदेश दिला जाईल. सदर बैठक मंगळवारी संपन्न होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे काम लक्ष्यात घेऊन त्यांना पाच महिन्याचा पगार देण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या राहिलेल्या सुट्ट्या देखील वापरण्याची सवलत दिली जाणार आहे. काढून टाकलेल्या (Spotify Layoffs) कर्मचाऱ्यांना वियोग कालावधीच्या वेळेस आरोग्य कव्हर सेवा मिळत राहील तसेच ते दोन महिन्यांसाठी आउटप्लेस मेंट सेवांसाठी ते पात्र ठरतील असे आश्वासन कंपनीने दिले आहे .