Starlink Internet : वाढत्या तांत्रिकी बदलांमुळे भारत सध्या जोमाने प्रगती करत आहे, यात सर्वाधिक मोलाचा वाटा ठरतो तो इंटरनेटचा. इंटरनेटच्या साहाय्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी संवाद साधणं अगदी सहज सोपं आहे. याचाच अर्थ असा कि वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे भलंमोठं जग एका मुठीत सामावल्यागत झालंय. कोविडच्या महामारीनंतर अनेक कंपन्यांनी घरून काम करण्याची नवीन पद्धत अंमलात आणली आणि परिणामी इंटरनेट सेवांची मागणीला सुरुवात झाली. तुम्ही नीट लक्ष्य दिलंत तर जाणवेल कि आता केवळ तांत्रिक क्षेत्रच नाही तर जवळपास सर्वच व्यवसायाच्या क्षेत्रांनी इंटरनेटची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. अगदी रोजच्या जीवनात देखील आता इंटरनेट सेवेच्या अभावी जगणं हे सोपं काम राहिलेलं नाही, मात्र इंटरनेटच्या विश्वात एक मोठी क्रांती घडून येणार आहे. कारण Elon Musk हे स्टारलिंक हि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी तयार करून नवीन बदल घडवण्यास सज्ज आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? या कंपनीने जर का भरगोस नफा कमवायला सुरुवात केली तर त्याचा विपरीत परिणाम देशातील Jio आणि Airtel यांसारख्या कंपन्यांना भोगावा लागू शकतो…
एलोन मस्क आहेत का धोक्याची घंटा?
एलोन मस्क यांनी Starlink हि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी वर्ष 2019 मध्ये सुरु केली होती आणि हि कंपनी लो ऑर्बिट सॅटेलाईट सर्व्हिसिस देते. एलोन मस्क म्हटलं कि त्यांच्या इंटरनेट सेवेचा बोलबाला सगळीकडेच केला जातो, मात्र एलोन मस्क यांची नवीन इंटरनेट क्रांती (Starlink Internet) जर का तुम्ही ऐकलीत तर नक्कीच अचंबित व्हाल, कारण मस्क सध्या विमानाच्या आत प्रवासादरम्यान इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची आखणी करीत आहेत. आपल्या माहितीप्रमाणे विमान सेवेत इंटरनेटचा वापर करता येत नाही, किंवा नेटवर्कच्या संदर्भात कोणत्याही गोष्टी विमानात वापरता येत नाहीत. म्हणूनच एलोन मस्क (Elon Musk) यांच्या नवीन योजनेला आधुनिक क्रांतीच म्हटलं पाहिजे. भारतात उपलब्ध असलेल्या इंटरनेट कंपन्या काही विमान प्रवासाच्या दरम्यान इंटरनेट सेवा उपलब्ध करवून देत नाहीत म्हणून मस्क यांची हि नवखी कल्पना बाकी स्पर्धकांचा व्यापार मुश्किल करू शकते.
आता हवेतही मिळणार इंटरनेट: Starlink Internet
एलोन मस्क यांच्या कंपनीकडून मिळणारी सेवा आता प्रवाश्यांना विमानातही इंटरनेट वापरायची संधी उपलबध करून देणार आहे. वर्ष 2003 मध्ये याबद्दलचा प्रस्ताव मांडला गेला होता आणि ब्रिटिश एअरवेज या विमान कंपनीने पहिल्यांदा इन-फ्लाईट इंटरनेट सेवेचा प्रयोग केला होता. खरं म्हणजे हे तंत्रज्ञान बरेच जुने आहे. सुरुवातीच्या काळात विमान कंपन्या जमिनीवरून उड्डाण करताना सिग्नल प्रसारित करणाऱ्या ग्राउंड स्टेशनवर अवलंबून होत्या आणि समुद्रात उड्डाण करताना उपग्रह कनेक्टिव्हिटीवर स्विच करत होत्या. मात्र हि इन-फ्लाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूपच कमी प्रमाणात वापरली जायची म्हणूनच याबद्दल आपल्याला अधिकी माहिती नाही, परंतु आता 20 वर्षांनंतर, इन-फ्लाइट इंटरनेट सेवा (Starlink Internet) पुन्हा एकदा बाजारात उपलब्ध झाली असून ती वेगवान इंटरनेटची सेवा प्रदान करीत आहे, ज्यामुळे प्रवाशांना खूप चांगला अनुभव मिळतोय.