Starlink Satellite : Elon Musk भारताला फास्ट स्पीड इंटरनेट देण्यासाठी सज्ज; केवळ परवानगी मिळणं बाकी

बिझनेसनामा ऑनलाईन । जगातील श्रीमंत लोकांच्या यादीतील एक एलोन मस्क (Elon Musk) लवकरच भारतात आपली स्टारलींक इंडिया नावाची कंपनी सुरु करण्याच्या तयारीत आहेत. Starlink India ही एक सेटलाइट बेस्ड इंटरनेट सर्व्हीसीस देणारी कंपनी असणार आहे. कंपनीला जर का सरकारकडून गोल्बल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सेटालाईट(Global Mobile Personal Communication By Satellite) यांच्याकडून लायसन्स मिळालं तर मस्क हा व्यवसाय सुरु करून हायस्पीड इंटरनेट सेवा भारतात घरोघरी पोहोचवण्याच्या विचारात आहेत.

देशात सुरु होणार Starlink Satellite?

स्टारलिंक इंडिया ही कंपनी सेटलाईटचा वापर करून घरोघरी इंटरनेट सेवा पोहोचवेल. कंपनीकडून कोणत्याही फायबर केबलसारख्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर केला जाणार नाही. कंपनी आता केवळ सरकारच्या होकारासाठी थांबून राहिली आहे. एकदा का सरकारने मंजुरी दिली कि लगेचच कंपनीचे काम सुरु होईल. हि कंपनी(Starlink Satellite) देशातील रहिवाश्यांना ब्रोडबेंडची सेवा उपलब्ध करवून देणार आहे.

आलेल्या माहितीनुसार सध्या कंपनी गृह मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहत आहे, काही आठवड्यांपासून हि उत्तराची अपेक्षा कायम आहे. एलोन मस्क यांच्या कंपनीने गेल्यावर्षीच GMPCS कडे परवानगीसाठी अर्ज केला होता व नेशनल स्पेस प्रमोशन एंड ओथोरायझेशन यांच्याकडून देखील परवानगी मागितली होती. भारताला इंटरनेट सेवा देण्यासाठी या परवानग्या मिळणं आवश्यक आहे.

भारताला मिळणार फूल स्पीड इंटरनेट:

स्टारलिंक भारताला सेटालाईट द्वारे इंटरनेट सेवा देणार आहे. एलोन मस्क यांच्या SpaceX कंपनीकडून 42,000 पेक्षा अधिक उपग्रह आकाशात सोडले आहेत. आणि स्टारलिंककडे पृथ्वीवर कुठेही इंटरनेट सेवा पोहोचवण्याची क्षमता आहे. आपण सध्या ज्या उपग्रहांचा वापर करून इंटरनेट सेवेचा वापर करतो ते आपल्यापासून 35,000 किलोमीटर दुर आहे. मात्र स्टारलिंकचा उपग्रह आपल्यापासून केवळ 550 किलोमीटर दूर असल्यामुळे इंटरनेटची स्पीड सर्वाधिक असणार आहे. हा व्ययवसाय सुरु झाल्यानंतर स्टार लिंकचे (Starlink Satellite) कनेक्शन मिळवण्यासाठी तुम्ही स्टारलिंक डिश, वाय-फाय, राउटर, केबल आणि बेसचा वापर करू शकता.