हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर रेल्वे सोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आयडियाची कल्पना घेऊन आलो आहोत. रेल्वे स्टेशन हे नेहमी प्रवाशांनी गजबजलेली असतात. त्याठिकाणी नेहमी वर्दळ पाहायला मिळते हे तर आपण जाणताच. त्याशिवाय तुम्ही रेल्वे स्टेशनवर थाटलेली दुकानेसुद्धा पहिलीच असतील जिथे 24 तास लोकांची गर्दी ओसंडून वाहत असते. जर तुम्ही रेल्वे platform दुकान उघडले तर तुम्हाला ग्राहकांची कधीच कमी भासणार नाही. तुम्ही कुठ्ल्याही platform वर तुमच्या आवडीचे दुकान सुरु करू शकता त्यासाठी रेल्वे टेंडर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ते कसे घ्यायचे हे आपण आता जाणून घेऊयात
रेल्वे स्टेशनवर दुकान चालू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी कुठल्या प्रकारचे दुकान उघडायचे आहे हे ठरवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन कुठल्या प्रकारे दुकान उघडायचे आहे त्याची पात्रता तपासावी लागेल.
कोणती कागदपत्र महत्वाची आहेत?
तुम्ही रेल्वे स्टेशनवर फूड स्टॉल, न्यूज पेपर व अन्य प्रकारचे दुकान उघडू शकता. पण त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे . रेल्वे प्लॅटफॉर्मवर दुकान उघडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रात आधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,वोटर आयडी कार्ड इत्यादींचा समावेश होतो . तसेच रेल्वे स्थानकावर दुकाने उघडण्यासाठी तुम्हाला शुल्क सुद्धा द्यावे लागतात. हे तुमच्या दुकानाचा आकार आणि स्थान यावर अवलंबून आहे. यामध्ये तुम्हाला 40,000 ते 3 लाख रुपयांपर्यंत फी भरावी लागेल.
स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी रेल्वेच्या टेंडरची माहिती हवी. त्यासाठी IRCTC वेबसाइटवर जा आणि तुम्हाला ज्या स्टेशनवर दुकान उघडायचे आहे त्यासाठी रेल्वेने निविदा काढली आहे का ते तपासा. टेंडर निघाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि रेल्वेच्या झोनल ऑफिस किंवा डीआरएस ऑफिसमध्ये जाऊन सबमिट करावा लागेल.