Startup : भारतात पुढील 4-5 वर्षात Startup 10 पटीने वाढतील; IT राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

बिझनेसनामा ऑनलाईन । युनिकॉर्न आणि स्टार्टअप्सच्या (Startup) निर्मितीमध्ये भारताचे काम उललेखनीय असून आगामी 4 ते 5 वर्षांमध्ये याच्यापेक्षा १० पटीने अधिक स्टार्टअप देशात सुरु होतील असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. राजीव चंद्रशेखर हैदराबादमध्ये JIIF (JITO इनक्युबेशन इनोव्हेशन फाऊंडेशन) च्या 6 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने गुंतवणूकदार/ स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील स्टार्टअप उद्योगाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला.

108 युनिकॉर्न 10,000 पर्यंत वाढतील- (Startup)

या कार्यक्रमात राजीव चंद्रशेखर म्हणाले, येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप आणि युनिकॉर्न मध्ये लक्षणीय वाढ झालेली असेल. त्याचबरोबर भारताने युनिकॉन आणि स्टार्टअप तयार करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केलेली असल्याचं देखील ते म्हणाले. आज भारतामध्ये एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप (Startup) असून यापुढे येत्या 4-5 वर्षांमध्ये यामध्ये जवळपास १० पटीने वाढ होईल. चार ते पाच वर्षांमध्ये 108 युनिकॉर्न 10,000 पर्यंत वाढतील असं त्यांनी म्हंटल.

त्याचबरोबर कौशल्य विकास वाढवण्यासाठी उद्योग आणि सरकार यांच्या प्रयत्नांचे राजीव चंद्रशेखर यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे एकंदर तंत्रज्ञान (Startup) क्षेत्राचा एक तृतीयांश भाग आता विस्तारला गेला असून भारतासाठी वेगवेगळ्या संधी वाट पाहत आहेत. 2014 मध्ये आपल्या देशाला तंत्रज्ञान फक्त IT आणि ITES पर्यंत मर्यादित होते. पण आता डीप टेक, ए आय, डेटा इकॉनॉमी, सेमीकंडक्टर डिझाईन, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि चांगल्या क्षमतेचे कम्प्युटर यासारख्या वेगवेगळ्या डोमेन मध्ये आपल्याला संधी निर्माण झालेल्या आहेत असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हंटल.