State Bank Viral Post: SBI कडून तुम्हाला बँक खातं लिंक करण्याचा मेसेज आला का? त्याआधी ही बातमी नक्की वाचा

State Bank Viral Post : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आहात का? स्टेट बँक ही आपल्या देशातील सर्वात परिचित बँक म्हणून ओळखली जाते. इतर बँकांच्या तुलनेत स्टेट बँकचा ग्राहक वर्ग देखील फार मोठा आहे. आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असलेली ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सोशल मीडियाच्या या युगात दररोज अनेक मेसेजेस फिरत असतात. मात्र फिरणाऱ्या या प्रत्येक मेसेजवर डोळे बंद करून विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण यातील प्रत्येक मेसेज खरा असेलच याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. देशभरात अश्या प्रकारचे खोटे मेसेजेस पाठवत लोकांना लुबाडण्याचे प्रकार देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या स्टेट बँकच्या बाबतीत देखील असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात असं म्हटलं गेलंय की तुमचं बँक खातं जर का पॅन कार्ड शी लिंक्ड नसेल तर ते बंद होऊ शकतं. तुम्हाला देखील असाच मेसेज आला आहे का? तर त्यावर विश्वास ठेवण्याआधी ही बातमी सविस्तर वाचा.

तुम्हाला स्टेट बँक चा मेसेज आला आहे का? (State Bank Viral Post)

सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाने खबरदारीने वागलं पाहिजे. सध्या सोशल मीडियावर स्टेट बँक कडून एक मेसेज वायरल करण्यात आलाय, ज्यात स्टेट बँक असा दावा करते की जर का तुमचं बँक खातं पॅन कार्डशी लिंक्ड नसेल तर ते त्वरित बंद होऊन जाईल. आता या मेसेजवर विश्वास ठेवावा की नाही असा संभ्रम अनेक लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे पटकन यावर विश्वास न ठेवता आधी ही बातमी सविस्तर वाचा.


पीआयपीच्या फॅक्ट चेक मधून समोर आलेल्या माहितीनुसार हा हॅकर्स कडून सामान्य जनतेला फसवण्यासाठी करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने याबाबत अधिक माहिती देण्यासाठी ट्विटर चा वापर केलाय. आपल्या अधिकृत खात्यावरून ते माहिती देतात की गेल्या काही दिवसांपासून स्टेट बँक च्या नावाने सामान्य जनतेची फसवणूक करणारा एक मेसेज पाठवला जात आहे. काही लोकांना तर कॉल करून पॅन कार्ड ची माहिती अपडेट करण्यास सांगितली जातेय .मात्र अशा चुकीच्या मेसेजना बळी पडू नका, त्यांवर विश्वास ठेवू नका. कारण हा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावटी आहे (State Bank Viral Post). अशा गुन्हेगारी प्रवृत्ती पासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी नेहमीच सतर्क रहावे असा सावधानगिरीचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

फसवणुकीपासून कायम सावध राहा:

कायम लक्षात घ्या की स्टेट बँक आपल्या ग्राहकांना नेहमीच अशा खोट्या मेसेज आणि कॉल पासून सावध राहण्याची माहिती देत असते. तसेच बँक कधीही कॉल किंवा मेसेज वरून खात्याशी संबंधित माहिती अपडेट करायला सांगत नाही किंवा अशा प्रकारची कोणतीही लिंक शेअर करत नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं बदलत्या टेक्नॉलॉजीचा गैरफायदा करून घेत तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत (State Bank Viral Post). त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका.

अशा प्रकारचे मेसेजेस आल्यास त्वरित त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांना ब्लॉक करा. चुकून सुद्धा अशा कुठल्याही लिंक वर स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नका. तसेच आजूबाजूला असा गुन्हा घडल्याचे समोर आल्यास त्वरित साइबर क्राईम सेलमध्ये या संबंधित घटनेची तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1930 नंबर वर कॉल करू शकता किंवा [email protected] वर जाऊन ईमेल द्वारे बँकला याची माहिती पुरवू शकता.