आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex 318 अंकांनी वधारला

बिझिनेसनामा ऑनलाईन ।आज आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्या दिवशी, शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 317.81 (0.51%) च्या वाढीसह 62,345.71 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 84.05 (0.46%) अंकांच्या वाढीसह 18,398.85 च्या पातळीवर बंद झाला. बाजारातीलहे दोन्ही प्रमुख निर्देशांक जबरदस्त वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले आहेत.

बीएसईच्या सेन्सेक्समधील 30 शेअर्स मधील 24 शेअर्सची उसळी घेतली तर 6 शेअर्स घसरणीसह बंद झाले. आजच्या ट्रेडिंग सत्रात उज्जीवन एसएफबी आणि डीएलएफचे शेअर्स प्रत्येकी ७ टक्क्यांपर्यंत वाढले. आज बीएसईवर एकूण 3,820 कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे 1,931 शेअर्स तेजीत आणि 1,712 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर आज 177 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कसलाही जास्त फरक पाहायला मिळाला नाही.

निफ्टीचे टॉप गेनर्स

टाटा मोटर्सचे शेअर्स जवळपास 15 रुपयांनी वाढून 530.85 रुपयांवर बंद झाले.

Hero MotoCorp चे शेअर्स जवळपास 86 रुपयांनी वाढून 2,691.90 रुपयांवर बंद झाले.

ITC शेअर 7 रुपयांनी वाढून 427.80 रुपयांवर बंद झाला.