Stock Market Carnage : सत्राच्या सुरुवातीलाच हेडलाईन निर्देशांक काही टक्क्यानी कमी झाल्यामुळे देशांर्गत असलेल्या इक्विटी बाजारांची आज सलग तिसऱ्या सत्रात घसरण वाढवली. निफ्टी 50 निर्देशांकाच्या F&O कराराच्या साप्ताहिक समाप्तीपूर्वी दलाल स्ट्रीटच्या आधारे अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटक याचे वजन करत आहेत. आज BSEचा बॅरोमीटर सेन्सेक्स सकाळी 835 पेक्षाही अधिक घसरल्याने सकाळी त्याने 70,665.50 चा आकडा गाठला होता. परिणामी मंगळवारपासून सलग तीन दिवसांची घसरण 840 अंकांच्या जवळ पोहोचली आहे. शेयर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या BSE वरील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजरी भांडवल मंगळवारच्या तुलनेत गुरुवारी 367.03 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले, आणि म्हणूनच सर्व गुंतवणूकदारांना 13.2 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. दलाल स्ट्रीटने बाजारी परिस्थितीला खालील घटकांना जबाबदार धरले आहे:
१) हॉकीश सेंट्रल बॅंक (Hawkish Central Banks): आर्थिक डेटा समोर आल्यानंतर सध्य जागतिक व्यापारी US फेडरल कडून दर कपातीची अशा धरून आहे. मार्चमध्ये फेडकडून किमान 25 बेसिस पॉइंट्स (bps) दर कपातीची 66.9 टक्के शक्यता असेल बाजारांची अपेक्षा आहे.
२)जागतिक बाजारात घसरण (Fall in Global Market) : सध्या जागतिक शेअर्स म्हणावी तशी कामगिरी बजावत नाही आहेत, चीनचा असलेला अस्पष्ट दृष्टिकोन हा देखील प्रमुख घटक मानला पाहिजे, म्हणूनच जागतिक दर सुलभतेचे चक्र सुरुवातीला विचार केल्याप्रमाणे तयार होऊ शकणार नाही. मात्र फेडरल रिझव्र्हने मार्चपासून सुरू केलेल्या दर कपातीवर गुंतवणूकदारांनी बाजी लावल्याने यूएस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाली आहे.
३) भू-राजकीय चिंता (Geopolitical Concerns) : अमेरिकन सैन्याने सांगितले की आत्तापर्यंत त्यांनी 14 हुथी क्षेपणास्त्रांवर हल्ले केले आहेत. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत अमेरिकेच्या हल्ल्याच्या चौथ्या दिवशी लाल समुद्रात तणाव वाढला होता. नोव्हेंबरपासून या प्रदेशातील जहाजांवर इराणचा सहयोगी हुथी मिलिथीयांनाही हल्ला चढवल्याने युरोप आणि आशियामधील व्यापार मंदावला आहे. भू-राजकीय तणाव वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान होऊ शकते.
४) इंडिया Incचा निकाल (India Inc Results) : इंडिया Incचे आत्तापर्यंतचे आकडे गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरले आहेत. HDFC, ICICI, Prudential Life Insurance आणि LTIMindTree ची मालिका बाजारी परिस्थितीनुसार व्यवहार करत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे HDFC बँकेचा तिमाही निकालाने बाजाराची निराशा केली. ठेवींमध्ये कमी वाढ झाल्यामुळे त्यांच्या निव्वळ व्याज उत्पन्नावर दबाव दिसून येतोय.
५) डॉलर निर्देशांकात वाढ (Rise in the Dollar Index): अमेरिकन किरकोळ विक्री डेटाने फेडरल रिझर्व्हकडून आसन्न दर (Adjacent rates) कपातीची अपेक्षा धुळीस मिळवून आर्थिक ताकदीचे संकेत दिल्यानंतर डॉलर निर्देशांक बुधवारी एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आणि गुरुवारी त्याच्या आसपास वावरत होता(Stock Market Carnage). युरोपियन सेंट्रल बँक (ECB) अधिकार्यांनीही युरोझोनमधील दर कपातीच्या अपेक्षेपेक्षाही मागे ढकलले आणि इक्विटीमधील उलाढाल आणखी कमी झाली.