बिझनेसनामा ऑनलाईन । आज शुक्रवारी म्हणजे २६ मे रोजी शेअर बाजार चांगलाच तेजीत पाहायला मिळाला. सेन्सेक्स 629.07 अंकांच्या वाढीसह 62,501.69 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे निफ्टी मध्येही 178.20 अंकांनी वाढ होत 18,499.35 वर बंद झाला. आजच्या शेअर मार्केट बाबत सांगायचं झाल्यास, बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सनी आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात चांगलेच पॉझिटिव्ह इन्टेन्ट दाखवला.
आज BSE वर एकूण 3,630 कंपन्यांचे ट्रेडिंग झाले, त्यापैकी सुमारे 1,967 शेयर वाढीसह आणि 1,524 शेयर घसरणीसह बंद झाले. तर 139 कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. दुसरीकडे, 164 शेयर 52 आठवड्यांच्या वरच्या व्यवहारावर बंद झाले आहे. आजच्या व्यवहारात हिंदाल्को इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, डिव्हिस लॅब्स, एचयूएल आणि हे निफ्टी वाढले. तर बजाज ऑटो, ओएनजीसी, ग्रासिम इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि पॉवर ग्रिड कॉर्प हे निफ्टी घसरले.
इतर आशियाई मार्केट बद्दल सांगायचं झाल्यास, दक्षिण कोरियाच्या कोस्पी, जपानच्या निक्केई आणि चीनच्या शांघाय कंपोझिट या शेअर्सचे भाव वाढलेले पाहायला मिळाला. तर युरोपातील बाजारात सुरुवातीला घसरण दिसत होती.