Stock Market Closing : Sensex 359 अंकांनी घसरून बंद झाल्याने गुंतवणूकदारांचे झाले मोठे नुकसान

Stock Market Closing: काल प्रमाणेच आज देखील शेअर बाजारात जोरदार विक्री झाली होती, मात्र IT आणि बँकिंग क्षेत्रात काही टक्क्यांची घसरण झाल्यामुळे बाजाराचा पुढचा कामकाज मात्र कोलमडून गेला. आज Sensex 359 अंकांनी घसरला आणि 70,700 च्या खाली आला तर निफ्टी देखील 101 अंकांनी घसरून 21,352 बंद झाला. पैकी टेक महिंद्राच्या महिन्याच्या शेअर्समध्ये आज 5 टक्क्यांची घसरण झालेली आहे. ॲक्सिस बँक आणि सन फार्मा यांचे शेअर देखील घसरलेले आहेत. संपूर्ण बाजारी कार्यकाळात आज MFCG आणि Pharma क्षेत्राच्या शेअर्स वरही काहीसा दबाव असलेला पाहायला मिळाला होता.

आज बाजार बंद होताना काय होती एकूण परिस्थिती? (Stock Market Closing)

निफ्टी मेडिकॅप -100 आणि निफ्टी IT यांच्या निर्देशकांत आजच्या संपूर्ण व्यवहारादरम्यान काहीशी घसरण झाली होती तर बीएसई स्मॉल कॅप(BSE Small Cap) निर्देशकात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळाली. आजच्या संपूर्ण बाजारी कार्यकाळात निफ्टी ऑटो निर्देशकातही काहीशी वाढ झाली होती तर निफ्टी फार्म आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अंकांमध्ये घसरण झाली होती.

शेअर बाजारातील कंपन्यांवर नजर टाकायचे झाली तर बजाज ऑटो, अदानी पोर्ट हे आजचे काही टॉप गेनर्स होते त्यांच्या शेअर्समध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली होती, तर दुसऱ्या बाजूला टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि LTI Mind Tree शेअर्समध्ये घसरण झाली होती.
आज बजाज ऑटो, पावर ग्रिड, इन्फोसिस आणि भारतीय रिटेलचे शेयर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होते, तर अदानी पॉवर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी होती. टाटा स्टील, TCS आणि ITC चे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. आज 25 जानेवारी 2024 रोजी मार्केट कॅप 371.28 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांचे भांडवल 9 हजार कोटींनी कमी झाले आहे.