Stock Market Holiday : गेल्या अनेक दिवसांपासून भारत श्रीराम मंदिर उदघाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येत सुरु असलेल्या 500 वर्षांच्या संघर्षानंतर 22 जानेवारी रोजी मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देशाच्या इतिहासात कायमचा कोरला जाणारा “न भूतो, न भविष्यती” असा हा सोहळा सर्वांना पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळावी म्हणून देशभरात हा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला गेला आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या भागातल्या शाळा, महाविद्यालये, बँका मंदिर बंद राहतील. मात्र लक्ष्यात असुद्या की या दिवशी देशात स्टॉक बाजारही बंद ठेवला जाईल, मिळालेल्या माहितीनुसार 22 जानेवारीच्या दिवशी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय BSE आणि NSE यांनी जाहीर केला आहे.
राम मंदिर सोहळ्यानिमित्त स्टॉक बाजार बंद: (Stock Market Holiday)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयानुसार राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त देशात 22 जानेवारी रोजी प्राथमिक किंवा दुय्यम बाजारात सरकारी सिक्युरिटीज, परकीय चलन, मनी मार्केट आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्हमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंट होणार नाहीत. हा पूर्ण दिवसात देशात व्यवहार बंद राहणार असून सर्व कामकाज 23 जानेवारी म्हणजेच दुसऱ्या दिवसापासून सुरु केल्ले जातील. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या Department of Financial Services कडून देशांर्गत बँकांना तसेच विमा कंपन्यांना 22 तारखेला दुपारी 2:30 वाजेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे, म्हणूनच या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि Central Industrial Institutions बंद राहणार आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून राज्यात 22 तारखेचा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला आहे, आणि त्यानंतर स्टॉक बाजारातून देखील मंदिर लोकार्पण सोहळ्यनिमित्त बाजारी कामकाज बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली (Stock Market Holiday). शेअर बाजार नियामक सेबीने Stock Exchange बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून Stock Tradersना सोमवारी 22 जानेवारी रोजी रामललाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.