Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ब्लूमबर्गने सादर केलेल्या अहवालानुसार भारतीय शेअर बाजारात नोंदणी केलेल्या शेयर्सची एकत्र वॅल्यु (Combined Value) 4.33 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 350 लाख अब्ज रुपयांवर जाऊन पोहोचली आहे आणि याच भन्नाट वाढीमुळे आता भारतीय बाजार जगभरातील चौथा मोठा इक्विटी बाजार( Equity Market) बनलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था कमालीची कामगिरी बजावत असल्याचे आपण जाणतोच, मात्र आता शेअर बाजाराने देखील पकडलेल्या तेजीमुळे केवळ देशी गुंतवणूकदरच नाही तर विदेशी गुंतवणूकदार देखील भारतीय बाजारात गुंतवणूक करण्याच्या विचारात आहेत.
भारत चौथा, तर पहिला नंबर कोणाचा? (Stock Market)
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारतीय शेअर बाजार हा जगभरातील चौथा शेअर बाजार बनलाय हे खरं, मात्र भारताच्या पुढे कोण वावरतंय हे माहिती आहे का? आपल्या तीन पाऊलं पुढे असलेले देश आहेत अमेरिका, चीन आणि जपान आणि आपल्या मागे एक पाऊल उभा आहे हाँगकाँग. अमेरिका आणि चीन हे नेहमीच जगाच्या पाठीवर ताकदवान देश म्हणून ओळखले जातात, अमेरिकेचा शेअर बाजार सध्या 50.86 ट्रिलियन डॉलर्सवर असून चीन 8.44 ट्रिलियन डॉलर्स तर जपान 6.36 ट्रिलियन डॉलर्सवर स्थिरावला आहे. मात्र आपल्या मागे असलेल्या देशाची म्हणजेच हॉंगकॉंगच्या शेअर बाजाराची एकत्र व्हॅल्यू(Combined Value) 4.29 ट्रिलियन डॉलर्स असल्याने आपल्याला प्रगतीचा जोर कायम धरून ठेवावा लागेल.
चीनची अर्थव्यवस्था धोक्यात?
चीनचा शेअर बाजार जरी जगभरात दुसऱ्या स्थानावर असला तरीही चीनची अर्थव्यवस्था काही ठीक नाही. अमेरिकेतील काही गुंतवणूकदारांनी चीनमधून काढता पाय घेतल्याने चीनला याचा बराच धक्का बसलेला दिसतोय. काही तज्ञांना कोरोनाकाळानंतर चीनची अर्थव्यवस्था सुधारेल असा अंदाज होता मात्र महागाईच्या विळखायत सापडलेला चीन अजूनही सुटकेचे प्रयत्न करीत आहे.
चीन जरी आर्थिक संकटांचा सामना करत असला तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, आणि परिणामी भारतीय शेअर बाजार सुद्धा प्रगती करताना दिसतोय (Stock Market). एकूण परिस्थिती पहिली तर येणाऱ्या काळात देशातील बँका व्याजदर कमी करतील अशी गुंतवणूकदारांना अशा आहे. तसेच आता 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्रायलकडून अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) प्रस्तुत केला जाईल, आणि बाजाराला आणखीन जोमाने काम करण्याची संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.