Stock Market : कालची निराशा संपली; आज बाजारपेठ पुन्हा हसतमुख झाली !!

Stock Market : कालच्या घसरणीनंतर आज सकाळी शेअर बाजारात दमदार सुरुवात झाली. रेल्वेच्या काही शेअर्सनी तर अनेक दिवसांपासून शेअर बाजार पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज बाजारी कार्यावळ संपत असताना शेअर बाजार बढतीसह बंद झाला. आजच्या व्यवहारानंतर Nifty 21,450 च्या पार जात क्लोजिंग देण्यात यशस्वी झाला तर Sensex 689.76 म्हणजेच 0.98 टक्क्यांच्या तेजीसह 71,60.31 वर बंद झाला. Nifty ने सुद्धा 215.20 अंक म्हणजेच 1.01 टक्क्यांच्या वाढीसह 21,454 वर बाजार बंद केला. काल शेअर बाजार बंद होत असताना अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झालेली असली, तरी आज बाजारात 2373 शेअर्स मध्ये वाढ झाली आहे, तर 1288 शेअर्स घसरले आहेत आणि यामध्ये 81 शेअर्स असेही आहेत ज्यांमध्ये कोणताही बदल घडलेला नाही.

निफ्टीवर धातू, इंधन, तंत्रज्ञान कंपन्यांचा दबदबा : (Stock Market)

आजच्या बाजारात धातू, इंधन आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी बाजी मारली. हिंडलको इंडस्ट्रीज, टाटा स्टील, पावर ग्रिड कॉपरेशन, HCL Technologies हे Nifty वरचे काही टॉप गेनर्स होते. तर दुसऱ्या बाजूला आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), ॲक्सिस बँक (Axis Bank), एशियन पेंट्स, अदानी पोर्ट आणि एचडीएफसी लाइफ (HDFC Life) हे NIfty वरील टॉप लूजर्स म्हणावे लागतील.

लिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले, “मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज बाजाराने जवळपास 1 टक्क्याची बढत मिळवली आहे. सकाळी बाजार उघडताना देखील एकंदरीत बाजाराची परिस्थिती कमकुवतच होती. मात्र, त्यानंतर काही दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी मिळवली आणि म्हणूनच बाजार बंद होताना आज निफ्टी हिरव्या कप्प्यात बंद झाला आहे.” आजच्या बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मोठा दिलासा मिळाला आहे(Stock Market). मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज बाजारात पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालाय.

शेअर बाजाराचा आजचा दिवस एकूणच चांगला होता. ऑटो, IT, कॅपिटल गुड्स, MFCG, मेटल, तेल आणि गॅस, पावर या क्षेत्रातील शेअर्समध्ये 1 ते 2 टक्के वाढ झाली. BSE Index आणि Small Midcap Index मध्ये जवळपास 2 टक्क्यांची वाढ झाली. आजच्या संपूर्ण बाजरी कामकाज दरम्यान बँकिंग इंडेक्सने आज आपल्या लॉंग टर्म मूव्हीग एवरेज तपासून पाहिला, तज्ज्ञांच्या मते Nifty वरील काही क्षेत्रात सध्या मोठी सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी.