Stock Market Opening: बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराला मोठा झटका बसला. सकाळी बाजार उघडताच जणू काय शेअर्स कोसळण्याची स्पर्धाच लागली होती. Bombay Stock Exchangeचा Sensex एका झटक्यात 650 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला. त्याच बरोबर, National Stock Exchangeचा Nifty सुद्धा 21,600 ची पातळी पार करून खाली घसरला. या घसरणीचा फटका फिनटेक कंपनी Paytmला ही बसला. इतकंच नाही, तर Paytmच्या मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स तर नवीन नीचांकावर पोहोचले. या घटनेमुळे गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहेत.
आज सकाळी कशी होती बाजारी स्थिती? (Stock Market Opening)
BSE Sensex मंगळवारी 71,555.19 च्या पातळीवर बंद झाला होता. पण जसं बुधवारी बाजार सुरू झाला, तसं Sensexमध्ये घसरण सुरू झाली. सुरवातीला ही घसरण 500 पेक्षा जास्त अंकांची होती आणि यानंतर काही मिनिटांतच ही घसरण वाढत जाऊन ती 600 गुणांपर्यंत पोहोचली आणि शेवटी Sensex 652.62 गुणांनी घसरून 70,902.56 च्या पातळीवर पोहोचला होता.
बऱ्याच काळापासून भारताच्या शेअर बाजारात चांगली तेजी आली होती पण आज मात्र वातावरण वेगळंच होतं. ना फक्त Sensex, तर त्याचा सोबती असलेला Nifty 50 देखील आज कोलमडून खाली आला(Stock Market Opening). सुरवातीलाच Nifty मध्ये 177.50 गुणांची घसरण झाली त्यामुळे निफ्टी 21,565.80 वर येऊन पोहोचल आणि सकाळी ही घसरण काही थांबली नाही. दिवस सरकता Niftyमध्ये आणखीन मोठी घसरण झाली आणि तो 180.65 गुणांनी खाली येऊन 21,562.60 च्या पातळीवर येऊन स्थिरावला. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे बाजार सुरू होताच जवळजवळ 628 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर उलट तब्बल 1724 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि ते लाल रंगात झळकू लागल्या.