Stock Market : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेमुळे बंद असलेला शेअर बाजार आज पुन्हा खुला झाला, आणि बाजारातील शेअर्सनी जोर पकडला. Sensex ने बाजार सुरु झाल्याक्षणी 72 हजारांवर मजल मारली आणि Nifty देखील 21700 वर खुला झाला. कालच सोलर क्षेत्राविषयी देशाच्या पंतप्रधानांनी विशेष घोषणा केल्याने या क्षेत्रातील शेअर्स जबर वेगाने वाढले आहेत. तर विषय आहे असा की, काल मंदिरात रामांची प्राणप्रतिष्ठा पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी दिल्लीत परतले आणि 1 कोटी घरांवर Solar Rooftop तयार करण्याची घोषणा केली होती, या दमदार आणि मोठ्या घोषणेनंतर आजचा शेअर बाजार आणखीनच चमकलाय.
काय आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना?
काल अयोध्येत नरेंद्र मोदींनी श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याच दिवशी पुन्हा दिल्लीत परतत एक मोठी घोषणा देखील केली. सदर घोषणेमध्ये त्यांनी तब्ब्ल 1 कोटी घरांवर Solar Rooftop बसवण्याची माहिती दिली आहे, तसेच या संपूर्ण योजनेला ‘प्रधानमंत्री सूर्योदय’ योजना असे नाव देण्यात आलं आहे. या योजनेला श्रीरामांशी जोडत मोदींनी सूर्यवंशांचा उल्लेख केला, आणि अश्या सूर्यवंशी घराण्यातील राम परत एकदा मंदिरात विराजमान झाल्याने देशातील जनतेने अंधारात जगू नये म्हणून या नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे असाही ते म्हणले.
घोषणेनंतर शेअर बाजार चमकला : (Stock Market)
प्रधानमंत्री मोदी यांच्या वरील घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी आली, खास करून एनर्जी क्षेत्रातील कंपनींच्या शेअर्समध्ये अधिक जोर आलेला पाहायला मिळाला. Tata Power च्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाल्याने एकूण अंक 354 रुपयांवर जाऊन पोहोचला. तसेच IREDA या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची वाढ झाल्याने एकूण आकडा 156.25 रुपये प्रति शेअरच्या पार गेला. या दोन महत्वाच्या कंपन्या वगळल्या तर सन फार्मा, भारती एयरटेल, ICICI Bank , पावर ग्रिड आणि TCS या कंपन्यांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी बजावली.
काल मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर आज शेअर बाजार पुन्हा खुला झाला आहे, आणि बाजार उघडताक्षणी Sensex आणि Nifty या दोघांनी जोर पकडलेला पाहायला मिळाला होता. Sensex तर 500 चा आकडा पार करून 72,039.20 वर बंद झाला आणि BSE Sensex च्या एकूण 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली होती (Stock Market). बाजारातील एकूणच अंदाज पाहिला तर Nifty ने सुद्धा जोर कायम ठेवत 21,716.70 वर व्यवहार सुरु केला होता.