Stock Market : “कालचा घसरण्याचा खेळ आज नाही चालणार!!” सकाळी SEnsex ने केली होती दणक्यात सुरुवात

Stock Market : काल संध्याकाळी शेअर बाजार बंद होत असताना अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. मात्र यानंतर आज सकाळी शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा दमदार तेजी आलेली पाहायला मिळाली. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर रेल्वे आणि बँकांच्या शेअर्सनी जोर पकडला होता. Sensex 446.90 अंकांवरून थेट 70,817.50 अंकांवर व्यवहार करू लागला, तर Nifty 69 अंकांनी वाढून 21,307.80 अंकांवर काम करीत होता. Bank Niftyमध्ये सुद्धा 239 अंकांची वाढ होत 45,255चा पल्ला गाठलेला पाहायला मिळाला. शेअर बाजार उघडल्यानंतर Sensexमध्ये काही टक्क्यांची घसरण झाली होती खरी, मात्र त्यानंतर लगेचच स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी आली आणि Sensex 70 हजारांच्या पार गेला, यामुळे सकाळी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.

Sensex ने पुन्हा पकडली होती जुनी वाट: (Stock Market)

काल म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजार कमकुवत वाटत होता. मात्र, आज सकाळी बाजाराने पुन्हा एकदा तेजी पकडली. निफ्टीच्या 43 शेअर्समध्ये अप्पर सर्किट आणि 56 शेअर्समध्ये लोवेर सर्किट लावण्यात आले. त्याचप्रमाणे, NSE च्या 1731 शेअर्समध्ये तेजी आलेली पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराच्या या तेजीला ‘कबूतराची उडी’ असे म्हटलं जाऊ शकतं कारण, कबुतरं कधीही अचानक उडी मारत नाहीत. ते पहिले परिस्थितीचा अंदाज घेतात आणि नंतर योग्य वेळी उडी मारतात. आज सकाळी शेअर बाजारातही काहीसा हाच प्रकार घडला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार कमकुवत वाटत होता. मात्र, आज सकाळी बाजाराने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नंतर तेजी पकडली.

BSE Sensex ने आज सकाळी जोरदार सुरुवात केली, टॉप 30 शेअर्सपैकी 24 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. ॲक्सिस बँक आणि एशियन पेट्स या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र 3 टक्क्यांचे घसरण झाली. तरीही एसबीआय (SBI), इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक(HDFC Bank) आणि IT च्या शेअर्समध्ये तेजी आलेली पाहायला मिळाली(Stock Market).

गेल्या काही दिवसांपासून बाजारात रेल्वेचे स्टॉक्स इतरांच्या तुलनेत उत्तम उत्तम कामगिरी बजावत आहेत. मंगळवारी बाजारात रेल्वेचे स्टॉक्स मात्र जबरदस्त आपटले होते, मात्र आज सकाळी पुन्हा एकदा NSEवर नोंदणी केलेल्या IRFC च्या शेअर्समध्ये 4.73 टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा थेट 168 रुपये प्रति शेअर्स वर जाऊन पोहोचला. शिवाय रेल्वे विकास निगमचे शेअर्स देखील 3 टक्क्यांनी वाढवून 297 रुपयांवर पोहोचले होते, रेल्वे विभागातील सर्वात परिचित कंपनी म्हणजेच IRCTC,या कंपनीच्या शेअर्समध्ये सुद्धा सकाळी 2 टक्क्यांची वाढ होऊन हा नवीन आकडा 953 रुपये प्रति शेअर्सवर पोहोचला होता.