Stock Market : अयोध्येत अद्याप राम मंदिराचे उद्घाटन झालेले नाही, सोमवारी होणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे आणि यात शेअर बाजारही मागे नाही. सोमवारी होणाऱ्या या सोहळ्यापूर्वी आपल्याला काही शेअर्सवर विशेष लक्ष्य द्यावं लागेल. अयोध्येतील अनेक हॉटेल्स, एअरलाईन्स आणि रेल्वेचे स्टॉक लक्षणीय कामगिरी करण्याच्या मार्गावर आहेत. अयोध्येत वाढलेली ये जा याला जबाबदार असून प्रत्येक क्षेत्रातील खरेदी विक्रीची प्रमाण वाढत आहे. मात्र शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक अथवा खरेदी करत असताना आपल्या सल्लागाराची नेहमीच शब्द विचारात घ्यावा. चला तर मग जाणून घेऊया अयोध्येतील शेअर बाजाराची एकूण स्थिती..
१) रेल्वेचे शेअर्स: सर्वात महत्वाचं म्हणजे मंदिर लोकार्पण सोहळ्यात इच्छुक असलेल्या भक्तांची गर्दी आता वाढत जाणार असून येणारा बराच काळ अयोध्येत पर्यटक आणि भक्तांची गर्दी कायम असणायची शक्यता आहे, म्हणूनच IRCTC चे शेअर्स ऑनलाईन बुकिंगमुळे तेजीत व्यवहार करत असलेले पाहायला मिळतात. बाजारातील माहितीनुसार गेल्या एका महिन्यात IRCTC च्या शेअर्समध्ये 23 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि आज IRCTC चा शेअर 1,025.00 वर बंद झाला आहे.
२) लार्सन एंड टूब्रो (Larsen and Toubro Ltd): लार्सन एंड टूब्रो या कंपनीला अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचे काम सोपवण्यात आले होते आणि याच तीन वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी आलेली आहे. मागच्या तीन वर्षात कंपनीच्या शेअर्स 230 टक्क्यांनी वाढले. काल म्हणजेच शुक्रवारी 3,648.60 रुपयांवर पोहोचत कंपनीने ऑल टाईम हाय गाठला होता, आणि आज दुपारी हा आकडा 3,637.40 रुपयांवर बंद झाला आहे.
३) इंडियन हॉटेल्स : राम मंदिर निर्माणामुळे सर्वाधिक फायदा होणार असलेले आणखीन एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे हॉटेल. पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी अयोध्या नगरीत अनेक मोठमोठाली हॉटेल्स आपले साम्राज मांडून तयार आहेत. अपोलो सिंदूरी (Apollo Sindoori) नावाच्या हॉटेलचे शेअर्स तर जोमाने प्रगती करीत आहेत. केवळ एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली(Stock Market).
४) प्रवेग : अयोध्येत टेंट सिटी बनवण्यात अव्वल असलेल्या प्रवेग (Praveg) या कंपनीचे शेअर्स लक्षणीय कामगिरी बजावत आहेत. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 30-35 टक्क्यांची बढत आली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये प्रवेगने अयोध्येतील ब्रह्मकुंड येथे लक्झरी रिसॉर्ट आणि टेंट सुरू केले होते आणि आत्ताच्या घडीला या टेंट सिटीमध्ये सुमारे त्यांचे 30 टेंट आणि रेस्टॉरंट सुरू आहेत.