Stock Market Timings: आजकाल गुंतवणुकीच्या पद्धती बरीच प्रमाणात बदलत आहेत. अगोदर आपण फक्त Post Officeच्या योजना, बँकमधले Fixed Deposits असे काही गुंतवणुकीचे ठराविक प्रकार असायचे, मात्र आता गुंतवणुकीची परिभाषा बदलली आहे. जिथून जास्तीत जास्त परतावा मिळेल तिथे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार ओढला जातो, किंबहुना वाढती महागाई पाहता ते बरोबर देखील आहे. बदलल्या प्रकारांमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शेअर बाजार, आपल्या देशातील शेअर बाजाराला जगाच्या पाठीवर चौथे स्थान देण्यात आले आहे. मात्र तुम्हाला माहिती असेल की इथे व्यापार करण्यासाठी काही ठराविक वेळ दिली जाते, आज याच बाबतीत आणखीन जाणून घेऊया.
शेअर बाजाराच्या काय आहेत ठराविक वेळा?
Bombay Stock Exchange (BSE) आणि National Stock Exchange (NSE) हे आपल्या भारतीय शेअर बाजारातील दोन प्रमुख निर्देशांक आहेत. इथे गुंतवणूकदार आपल्या आवडत्या कंपन्यांचे शेअर्स ब्रोकरच्या मदतीने सकाळी 9.15 वाजल्यापासून दुपारी 3.30 वाजेपर्यंतच विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात(Stock Market Timings). आठवड्याचे पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार शेअर बाजारात व्यवहार होत असतो, तर शनिवार आणि रविवारच्या दिवशी बाजार बंद राहतो.
शेअर बाजार कधी उघडतो? (Stock Market Timings)
सकाळी 9 ते 9:15 ही वेळ शेअर बाजारात Pre-opening ची वेळ मानली जाते, म्हणजेच यावेळी बाजार उघडलेला नसतो तरीही गुंतवणूकदार त्यांच्या ऑर्डर देऊ शकता. भारतीय शेअर बाजार सुरू होण्याच्या अगदी पहिल्या 8 मिनिटांमध्ये, सकाळी 9 वाजेपासून ते 9:08 पर्यंत गुंतवणूकदार खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डर्स देऊ शकता. शिवाय या 8 मिनिटांमध्ये ऑर्डर्स बदलू शकता किंवा रद्दही करू शकता.
भारतीय शेअर बाजारात सकाळी 9-08 ते 9.12 ही वेळ खूपच रोमांचक असते, कारण या चार मिनिटांत खरेदीदार आणि विक्रेत्यांची एक थरारक जुगलबंदी पाहायला मिळते. ज्यांना आपल्या आवडत्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत ते खरेदीदार बाजारात उतरतात तर विक्रेते आपले शेअर्स विकायला उडी घेतात. या काळात खरेदी आणि विक्रीच्या ऑर्डरची एकत्रीकरण केलं जातं आणि त्यानुसार शेअर्सची किंमत ठरवली जाते.
भारतीय शेअर बाजारची खरी मजेशीर सुरवात होण्याआधीचा शेवटचा टप्पा म्हणजे सकाळी 9:12 ते 9:15 हा असतो. या थोड्याशा वेळात नवीन ऑर्डर्स देणे बंद होते. इतकेच नाही तर आधी घातलेले ऑर्डर देखील बदलता येत नाहीत. शेवटी सकाळी 9:15 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत या काळात खरेदी-विक्रीचा धूमधडाका असतो.
शेअर बाजार कधी बंद होतो?
शेअर बाजार बंद होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी म्हणजेच 3 ते 3:30 दरम्यान ज्या किंमतींना शेअर्सची खरेदी-विक्री होते त्यांची एक सरासरी काढली जाते. याच सरासरी किंमतीवरून Nifty, Sensex, S&P Auto सारख्या निर्देशांकांच्या अंतिम बंद भाव ठरवलं जातो (Stock Market Timings). संध्याकाळी 3:40 वाजता बाजार बंद होतो, पण त्यानंतर 4 वाजेपर्यंत गुंतवणूकदार खास ऑर्डर देऊ शकता. या ऑर्डरद्वारे गुंतवणूकदारांना दुसऱ्या दिवशीच्या शेअरच्या खरेदी-विक्रीसाठी किंमत सांगण्याची मुभा दिली जाते.