Stock Market Today: शेअर बाजाराबद्दल इच्छुक असणाऱ्यांसाठी आज पुन्हा एकदा आम्ही बाजाराचा अहवाल घेऊन आलो आहोत. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडस्मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढत आहे आणि तुम्ही देखील यांपैकीच एक असाल तर आजची ही बातमी लक्ष देऊन वाचा. आजच्या बाजारी दिवसात Sensex 190 अंकांची वाढून 72,832 वर बंद झाला आणि Nifty 22,096 वर बंद झाला आहे.
आज कसा होता बाजारी दिवस? (Stock Market Today)
आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, IT क्षेत्रातील घसरण सोडल्यास Pharma, Realty आणि Auto निर्देशांकात वाढ झाली आहे. आज Nifty च्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. Sensex मधील 30 शेअर्सपैकी 21 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत.
Hero MotoCorp, मारुती सुझुकी, UPL आणि Apollo Hospital यांच्यासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. Sun Pharma, SBI Life आणि Sipla या कंपन्यांच्या शेअर्समध्येही 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली(Stock Market Today). दुसरीकडे, LTI माइंडट्री, Infosys, विप्रो, HCL, टेक महिंद्रा, TCS आणि टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि अगदीच थोडक्यात सांगायचं तर आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.