Stock Market Today: उद्या देशात बजेट प्रस्तुत होणार म्हणजेच त्याचा परिणाम आज शेअर बाजारावर होणार हे साहजिकच होतं. आज सकाळी Sensex 600 अंकांनी वाढलाय आणि Nifty मध्ये देखील 180 अंकांची वाढ झाली, Bank Nifty ने तर आज कामालाच केली, थेट 46 हजारांच्या पार नेऊन झेंडा रोवला. एकंदरीत अंदाज घ्यायचा झाला तर आज बाजाराची सुरुवात मात्र छान झाली होती. BSE च्या टॉप 30 शेअर्स मधल्या 27 शेअर्समध्ये तेजी आली होती.
आज शेअर बाजाराने केलीये दमदार सुरुवात: (Stock Market Today)
उद्या बजेट येणार आणि आजच बाजारातील काही शेअर्सनी मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. Sensex आणि Nifty ने तर जबरदस्त आकडे नोंदवलेच पण Nifty मधल्या 30 कंपन्यांपैकी एकूण 27 कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी आल्याने बाजार खुश झाला आहे. आज सकाळी Sensex 71,073.04 अंकांवर उघडला, आणि लगेचच काही अंकांमध्ये वाढ झाल्याने 616 अंकांच्या तेजीत 71,756.18 वर जाऊन पोहोचला. Nifty देखील शर्यतीत मागे नव्हता, आज Nifty ची सकाळी सुरुवात जारी 21,487.25 वर झाली असली तरीही लगेच कंपन्यांच्या शेअर्सनी जोर पकडला, Nifty मध्ये यामुळे 180 अंकांची वाढ झाली आणि नवीन आकडा 21,702.15 पर्यंत जाऊन पोहोचला.
Nifty चे 27 धुरंदर कोण?
जसं की आपण वरती पाहिलं Nifty च्या 30 कंपन्यांपैकी एकूण 27 कंपन्यांच्या शेअर्सनी आज मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. या कमालीच्या तेजीत असलेल्या कंपन्यांमध्ये सन फार्मा (Sun Pharma), एक्सिस बैंक (Axis Bank), टाटा मोटर्स (Tata Motors), मारुति, आईसीआईसी बैंक(ICICI Bank) आणि रिलायंस कंपनी यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये एकूण 3 टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली. आज NSE वरील 1,612 शेअर्समध्ये वाढ झाली आहे, यांमध्ये 689 शेअर्स जारी घसरले असले तरीही 111 शेअर्स आपल्या जाग्यावर कायम आहेत (Stock Market Today). आत्तापर्यँतच्या कार्यकाळात 184 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. शेवटी वोल्टस,डॉ रेड्डी लैबोरेटर आणि ICICI securities ना आजचे टॉप गेनर्स म्हणावे लागतील.