Stock Market Today: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची परिस्थिती कठीण बनली होती मात्र आज चिन्ह बदलली आहेत. कित्येक दिवसानंतर आज बाजारात सुधारणा झाली आहे. BSE Sensex 526 पेक्षा अधिक अंकांनी वाढून 72,996 पोहोचला तर NSE वर Nifty 0.65 टक्क्यांच्या वाढीसह 22,147 वर बंद झाला.
आज कसा होता बाजारी दिवस? (Stock Market Today)
आजच्या बाजारात तेल, ऊर्जा, IT, Pharma यांसारख्या क्षेत्रांमध्ये चढ उतार पाहायला मिळाला. आज बाजारात Small Cap शेअर्समध्ये जास्ती खरेदी दिसून आली होती, Mid Cap मध्ये देखील काहीशी वाढ होतीच पण यामुळे Nifty च्या अंकांमध्ये 1 टक्क्याची वाढ झाली होती. Sensex आणि Nifty च्या आकड्यांकडे पाहायचं झाल्यास, Sensex मधील 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले होते तर दुसऱ्या बाजूला Nifty च्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
आजच्या बाजारी दिवसांत HDFC बँक आणि रिलायंसने दमदार कामगिरी करून दाखवली. अगोदर रिलायन्सने 3000 रुपयांचा उच्चांक गाठला तर त्यानंतर HDFC बँकने देखील तोच जोर कायम ठेवला (Stock Market Today). आज बाजाराने दाखवलेल्या याच सकारात्मक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बऱ्यापैकी वाढ झाली. आजच्या बाजारी सत्रात गुंतवणूकदारांनी तब्बल 1.33 लाख कोटी कमावले. बाजाराबद्दल माहिती जाणून घेण्यात इच्छुक असणाऱ्याने लक्ष्यात घेतलं पाहिजे की आज मारुती सुझुकीच्या Market Capने 4,00,004.96 कोटी रुपयांच्या इंट्राडे सर्वोच्च पातळी गाठून NSE वर एवढी मोठी कामगिरी पहिल्यांदा करण्याचे पद भूषवले आहे.