Stock Market Today: आज बाजाराला शिवरात्रीची सुट्टी; थेट सोमवारी सकाळी खुले होईल ट्रेडिंग

Stock Market Today: घर बसल्या महाशिवरात्रीच्या सुट्टीची मजा घेत आहेत का? आणि मग आज शेअर बाजार तपासून पाहिलात की नाही? शेअर बाजाराची आज एक गंमतच आहे म्हणा!! हो तुम्ही अगदी बरोबर आणि खरी बातमी वाचत आहात, आज बाकी सर्व क्षेत्रांप्रमाणे शेअर बाजार देखील सुट्टीवर गेला आहे.

आज शेअर बाजार गेला आहे सुट्टीवर: (Stock Market Today)

देशभरातील इतर क्षेत्रांप्रमाणे आज शेअर बाजार देखील महाशिवरात्रीची सुट्टी अनुभवत आहे. BSEच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार होता आणि म्हणूनच जर का तुमच्या शेअर बाबत आज काहीच हालचाल जाणवत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. आत थेट सोमवारी, आपल्या रोजच्या वेळेप्रमाणे म्हणजेच 9:15 वाजता सकाळी बाजार उघडेल आणि तुम्ही सर्व कामे पूर्ववत करू शकता.मात्र डेरिव्हेटिव्ह विभाग (Commodity Derivatives Segment) आणि Electronic Gold Reception (EGR) विभागातील व्यवहार संध्याकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू होणार आहेत.

मुंबईच्या शेअर बाजारात कालचा दिवस उत्साहवर्धक राहिला. दोन्ही प्रमुख निर्देशांक म्हणजेच, Sensex आणि Nifty नवीन विक्रमी उच्चांवर बंद झाले. BSE चा Sensex 33.4 अंकांच्या वाढीसह 74,119.39 वर बंद झाला(Stock Market Today). तर, Nifty निर्देशांक 25.35 अंकांनी वधारून 22,499.4 च्या नवीन उच्चांवर पोहोचला. टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा स्टील, HDFC आणि JSW Steel या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी होती. मात्र, महिंद्रा अँड महिंद्रा, BPCL, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ICICIच्या शेअर्समध्ये घसरण झाली.