Stock market today: शेअर बाजारात पुन्हा घसरण; Sensex-Nifty चे आकडे काय सांगतात?

Stock market today: भारताच्या शेअर बाजारात आज चढ-उतराची स्थिती पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठेत घसरण असताना भारतात मात्र तेजी दिसून आली. फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्यास विलंब करेल आणि ग्राहक उत्पादन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होईल अशी भीती असूनही भारतात तेजी कायम राहिली.

आज कशी होती बाजारी स्थिती? (Stock market today)

मुंबईच्या शेअर बाजारात (Bombay Stock Exchange – BSE) Sensex निर्देशांक हा आज 27.09 गुणांनी घसरून 73,876.82 इतक्या पातळीवर बंद झाला. तर दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजारात (National Stock Exchange – NSE) Nifty 50 हा 18.65 गुणांनी घसरून 22,434.65 इतक्या पातळीवर बंद झाला.

Nifty मध्ये नेस्ले, बजाज ऑटो, डॉ रेड्डीज, कोटक महिंद्रा बँक आणि ब्रिटानिया यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली(Stock market today). तर दुसरीकडे श्रीराम फायनान्स,NTPC, डिविजर लॅब्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

आज निफ्टी बँक निर्देशांकात देखील वाढ झाली आणि हा निर्देशांक 78.80 गुणांनी वाढून 47,624.25 इतक्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर, Nifty Midcap 100 आणि Nifty Smallcap 100 यांनी अनुक्रमे 0.52 टक्के आणि 1.16 टक्के वाढून प्रमुख निर्देशांकांच्या पुढे गेले.