Stock Market Today: निफ्टी-सेन्सेक्समध्ये 1 टक्क्याची घसरण; कसा होता बाजाराचा पहिला दिवस?

Stock Market Today: आपल्या भारतातील गुंतवणदार सध्या सावध वृत्तीने आर्थिक आकडेवारीकडे लक्ष देऊन वाट पाहत आहेत. त्याचबरोबर जगातील इतर देशांमधील शेअर बाजारांमधील घसरणीचा परिणामही आपल्या बाजारावर झाला आहे, यामुळे गुंतवणदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले आणि त्यामुळे बाजारात घटी झाली.

आज कसा होता BSE चा दिवस? (Stock Market Today)

आजच्या बाजारी दिवसांत Nifty50 तब्बत 161 अंकांनी म्हणजेच 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह 22,332.65 वर बंद झाला आणि Sensex 617 अंकांनी म्हणजेच 0.83 टक्क्यांनी घसरून 73,502.64 वर बंद झाला. Sensex च्या 30 कंपन्यांपैकी तब्बत 22 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यांपैकी पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि SBI यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. आज BSE Small Cap निर्देशांक 2.01 टक्क्यांच्या घसरणीच्या बंद झाला तर BSE Mid Cap निर्देशांक 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

Nifty चे आकडे काय सांगतात?

Nifty50 आज थोड्याश्या घसरणीसह बंद झाला, पण या घसरणीच्या वातावरणातही काही सुखद कमाई करणारे सूर होते. अपोलो हॉस्पिटल्स, नेस्ले इंडिया आणि SBI Life Insurance कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली(Stock Market Today). या तिन्ही कंपन्या Nifty50 मधील Top Gainers ठरल्या. दुसरीकडे मात्र 33 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, ज्यात Tata Consumer Products, Power Greed Corporation Of India आणि Bajaj Auto च्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली होती.