Stock Market Weekly Update: गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेली शेअर बाजारातील घसरण या आठवड्यात थांबली आणि बाजारने दोन महिन्यातील सर्वाधिक साप्ताहिक वाढ नोंदवली. सकारात्मक जागतिक संकेत, यूएस फेडचे निर्णय, IMF ने भारताच्या वाढीच्या अंदाजात केलेले सकारात्मक बदल आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा वेग मंदावल्याने बाजाराला चालना मिळाली आहे.
कसा होता या आठवड्याचा बाजार? (Stock Market Weekly Update)
Niftyने या आठवड्यात 2.34 टक्के किंवा 501 अंकांची वाढ नोंदवली आणि निर्देशांक आठवड्याच्या अखेरीस 21853.8 च्या पातळीवर बंद झाला. दुसऱ्या बाजूला Sensex 2 टक्के किंवा 1384.96 अंकांनी वाढून 72085.63 च्या पातळीवर बंद झाला. एवढाच नाही तर या आठवड्यात सरकारी बँकांच्या निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे. निफ्टी ऑइल अँड गॅस क्षेत्रात 9 टक्के, निफ्टी एनर्जी इंडेक्समध्ये 8 टक्के आणि निफ्टी मेटल, ऑटो आणि रिअल्टी इंडेक्समध्ये 4-4 टक्के वाढ नोंदवली गेली.
गुंतवणूकदारांची कमाई किती झाली?
या आठवड्यातील अनेक स्टॉक्स गुंतवणुकदारांसाठी नफ्याची खाण बनले आहेत (Stock Market Weekly Update). पूर्ण काळात 100 पेक्षा जास्त स्टॉक्समधून 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. संपूर्ण आठवड्यात 18 स्टॉक्स 25 टक्क्यांहून अधिक वाढले, तर 8 स्टॉक्सनी 5 सत्रांत 30 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला. NBCC इंडिया, शक्ति पंप्स इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, KPI ग्रीन एनर्जी, Hemisphere Properties, इंफीबीम एवेन्यू आणि IRB इंफ्रा हे स्टॉक सर्वाधिक वाढणाऱ्या स्टॉकमध्ये सामील होते आणि दुसरीकडे बाजारातील पाच स्टॉक्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्ती घसरण झाली ज्यापैकी एका स्टॉकमध्ये जवळपास 13 टक्क्यांपर्यंत घट झालेली पाहायला मिळाली.