बिझनेसनामा ऑनलाईन : शेअर बाजारात आगामी काळात गुंतवणूकदारांना या 4 शेअर्समध्ये 50% पर्यंत कमाईची संधी आहे. पण जर तुम्ही अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यात अधिक फायदा होईल . सध्या शेअर्स बाजारात काही शेअर्सच्या किंमती वाढणार असून त्याबाबत सर्वप्रथम माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत . हे शेअर्स केव्हा आणि कोणत्या किंमतीला खरेदी करायचे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हि माहिती उपयुक्त ठरेल.
नुकतेच स्टॉक मार्केटमध्ये काही कंपन्यांनी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्यातून काही कंपन्यांना झालेल्या अमाप नफा झाल्याची बातमी बाजारात पसरताच त्या शेअरने सकरात्मक वाटचाल सुरु केली आहे. जर तुम्ही त्या शेअरमध्ये आता गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही येथे तुम्हाला 4 कंपन्यांची माहिती सांगणार आहोत ज्यात केलेली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरू शकते.
क्रॉम्प्टन ग्रीव्हज (Crompton Greaves)-
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजला सध्याच्या पातळीवरून क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या शेअर्सवर 50.32 टक्क्यांची मजबूत वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेजने स्टॉकला ‘BUY’ रेटिंग दिले आहे ज्याची target price रु 400 आहे. एनएसईवर मंगळवारी कंपनीचे शेअर्स 266.10 रुपयांवर बंद झाले.
बालाजी अमाईन्स (Balaji Amines) –
कंपनीच्या टॉप- मॅनेजमेंट मधील काही सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर अलीकडेच ह्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. तथापि, ब्रोकरेज फर्म एडलविसचा असा विश्वास आहे की बालाजी अमाईन्सचे शेअर्स सध्याच्या पातळीपेक्षा 40 टक्क्यांनी वाढू शकतात. ब्रोकरेजकडे रु. 3090.00 च्या target price सह स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे.
सारेगामा इंडिया (Saregama India)-
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने सारेगामा इंडियाच्या शेअर्सवर खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. ब्रोकरेजने स्टॉकवर खरेदी रेटिंग रु. 400 च्या लक्ष्यित किंमतीसह आहे, सध्याच्या पातळीपासून 27.63 टक्के परतावा अपेक्षित आहे. मंगळवारी NSE वर सारेगामाचा शेअर 313.40 रुपयांवर बंद झाला.
जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (G R Infraprojects) –
देशांतर्गत ब्रोकरेज कीनोट कॅपिटल्सने 1363.00 रुपयांच्या target price सह GR इन्फ्राप्रोजेक्ट्सवर ‘BUY’ रेटिंग दिले आहे. हे सध्याच्या किमतीपेक्षा त्याच्या शेअर्समध्ये सुमारे 23.03 टक्के वाढ दर्शवते. मंगळवारी NSE वर GR Infraprojects चे शेअर्स रु. 1107.90 वर बंद झाले.