Student Insurance : महाराष्ट्र सरकारचा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय; फक्त 20 रुपयात घ्या लाभ

Student Insurance: सरकारकडून जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जातात. खास करून गोरगरीब जनता, महिलावर्ग, वृद्ध अशा लोकांना मदत करणे आणि सुरक्षित भविष्य मिळवून देणे यांसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. त्यातच आता महाराष्ट्रातील शिंदे सरकारने राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना आणली आहे. हि एक विमा योजना असून शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर पालक देखील या विमा योजनेचा भाग बनू शकतात, ते कसे पाहूयात…

राज्य सरकारची विमा योजना : Student Insurance

महाराष्ट्र सरकार कडून पुन्हा एकदा विधार्थ्यांसाठी एक नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या विमा योजनेचा प्रीमियम 20 रुपयांपासून सुरु होतो आणि यात वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण देऊ केले जाणार आहे. हि योजना राज्यातील सरकारी तसेच अनुदानित महाविद्यालयांसाठी सुरु केली जाणार आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर रोजी हा निर्णय जारी केला होता. सरकारची हि विमा योजना सर्व विद्यार्थी वर्गासाठी असली तरीही यात काही अपवाद आहेत, जसे कि आत्महत्या, गर्भधारणा आणि बाळंतपण , साहसी खेळांमध्ये सहभाग, दारूमुळे होणारे अपघात,ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन इत्यादी घटनांना विमा संरक्षण दिले जाणार नाही.

अशी आहे विमा योजना:

हि विमा योजना (Student Insurance) विधार्थ्यांना 20 रुपयांचा प्रीमियम भरून 1 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक आणि अपघाती विमा संरक्षण देईल, हा विमा ICICI च्या अंतर्गत दिला जाणार असून हि पॉलीसी एका वर्षासाठी लागू होईल. मात्र जर का तुम्ही 62 रुपयांचा प्रीमियम विकत घेतलात तर यावर एवढ्याच कालावधीसाठी 5 लाख रुपयांचे कव्हरेज दिले जाईल.अपघाती उपचारांवर जर का तुम्हाला कव्हारेज हवे असेल तर 422 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल आणि हा विमा नॅचरल इन्शुरन्स कंपनी देऊ करेल .

या विमा योजनेचे लाभार्थी बनण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, प्रशासित, वर्गीकृत असलेल्या महाविद्यालये, संस्था किंवा विद्यापीठांचा भाग असणे अनिवार्य आहे, इथे सेकेंन्डरी विमा सद्यस्य म्हणून विद्यार्थ्यांचे पालक लाभार्थी म्हणून सामील असतील