Subrata Roy यांचे कुटुंब भारतात परतणार नाही; ‘या’ देशात सुरु करणार 3 नवीन कंपन्या

बिझनेसनामा ऑनलाईन । मागच्या अनेक दिवसांपासून आजाराशी दोन हात करीत असलेल्या सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सुब्रत रॉय हे आपल्या देशातील अनेक मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते आणि त्यांनी सहारा इंडिया या कंपनीची स्थापना केली होती. पण केवळ व्यवसायच नाही तर खेळ, सिनेमा आणि राजकारणातही सुब्रत रॉययांनी स्वतःची एक छबी निर्माण कर्ली होती. मात्र गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यामुळे रॉय यांच्या विरोधात काही सरकारी खटले सुरु झाले होते आणि यांपासून दूर राहण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासह भारत देश कायमचा सोडला होता, आता त्यांच्या निधनानंतर मागे पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे व त्यांचा पुन्हा देशात परतण्याचा काही विचार दिसत नाही.

सहारा इंडिया परिवार भारतात परतणार नाही: (Subrata Roy)

सुब्रत रॉय (Subrata Roy) यांच्या निधानंतर त्यांची पत्नी स्वप्ना रॉय आणि मुलगा सुशांतो रॉय असा परिवार मागे राहिला आहे आणि हेच आता सहारा इंडिया कंपनीचे सर्वेसर्वा बनले आहेत. सध्या आई आणि मुलगा यांचे वास्तव्य मैसेडोनिया येथे असून भारतात परतण्याचा त्याचा काही विचार दिसत नाही. कंपनीने या बाबत काही खुलासा केलेला नसला तरीही येणाऱ्या काही काळात सहारा कंपनीच्या एकूण तीन उपकंपन्या मैसेडोनियामध्ये आपल्या व्यवसाय सुरु करू शकतात. सहारा कंपनी परदेशातच डेरी, सेवन स्टार होटल आणि फिल्म प्रोडक्शनचा व्यवसाय सुरु करू शकते.

कुठे आहे मैसेडोनिया?

मैसेडोनिया हा देश दक्षिण पूर्व युरोपमध्ये स्थित आहे. या देशाची नागरिकता मिळवण्यासाठी 4 लाख युरोची गुंतवणूक करावी लागते किंवा 10 लोकांना नोकरी द्यावी लागते. सुब्रत रॉय (Subrata Roy) आणि मैसेडोनिया यांचे राजकीय संबंध फारच चांगले होते. अनेकवेळा सुब्रत रॉय मैसेडोनियामध्ये राजकीय अतिथी म्हणून सुद्धा आमंत्रित केले गेले आहेत. मैसेडोनिया या देशाची ओळख वर्ष 1993 पासून एक संयुक्त राष्ट्र म्हणून केली जाते.